Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > तुमच्या जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी करा 'ह्या' सोप्या उपाययोजना; वाचा सविस्तर

तुमच्या जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी करा 'ह्या' सोप्या उपाययोजना; वाचा सविस्तर

Follow these simple steps to increase the nitrogen content in your soil; Read in detail | तुमच्या जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी करा 'ह्या' सोप्या उपाययोजना; वाचा सविस्तर

तुमच्या जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी करा 'ह्या' सोप्या उपाययोजना; वाचा सविस्तर

जमीन सुपीकता आणि उत्पादकता ठरविण्यात नत्र या अन्नद्रव्याचा खूप मोठा वाटा आहे. नत्र हे स्फुरद व पालाश पिकांना उपलब्धता होण्यास मदत करते.

जमीन सुपीकता आणि उत्पादकता ठरविण्यात नत्र या अन्नद्रव्याचा खूप मोठा वाटा आहे. नत्र हे स्फुरद व पालाश पिकांना उपलब्धता होण्यास मदत करते.

जमीन सुपीकता आणि उत्पादकता ठरविण्यात नत्र या अन्नद्रव्याचा खूप मोठा वाटा आहे. नत्र हे स्फुरद व पालाश पिकांना उपलब्धता होण्यास मदत करते.

तसेच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही उपलब्धता होण्यास नत्र मदत करत असते. बहुतांश पिकांना नत्र या अन्नद्रव्याची गरज मोठ्या प्रमाणामध्ये असते.

ऊस, भात, ज्वारी, कांदा, आले, हळद आदी जमिनीमध्ये किती प्रमाणात नत्र उपलब्ध आहे, हे माती परीक्षण करून समजते.

त्यानंतरच वरील प्रकारची पिके घेण्याचे नियोजन करावे. कारण, पिकांची उत्पादकता ही जमिनीतील नत्राची उपलब्धता किती आहे यावर अवलंबून आहे.

माती परीक्षणातून जमिनीमध्ये नत्राची उपलब्धता १४० ते २८० किलो प्रतिहेक्टरपेक्षा कमी आढळून आली तर जमिनीमध्ये नत्राची कमतरता आहे, असे समजावे.

अशा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची ही कमतरता आढळून येते. कारण, सेंद्रिय कर्ब आणि नत्र या दोन्हीचा संबंध खूपच जवळचा आहे.

जमिनीत नत्र उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना
◼️ नत्र या अन्नद्रव्याची कमतरता भरून येण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा, शेणखत, कंपोस्ट आणि गांडूळ खताचा तसेच हिरवळीच्या खतांचा वापर खूप गरजेचा आहे.
◼️ यामध्ये सेंद्रिय आणि गांडूळ खत आदींच्या माध्यमातून नत्र वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो.
◼️ तथापि हिरवळीची खते (उदा. ताग, धैंच्या जमिनीमध्ये गाढणे)
◼️ द्विदल वर्गीय पिके यामध्ये भुईमूग, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा आदी पिके घेतल्यास जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या नत्राचे प्रमाण वाढते.
◼️ याशिवाय पिकांची फेरपालट करणेही गरजेचे आहे.
◼️ कारण एकाच प्रकारची वारंवार पिके घेण्यामुळे जमिनीतील नत्र या अन्नद्रव्यावर खूप मोठा ताण येऊन त्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर येऊन उत्पादनावर परिणाम होतो.
◼️ यासाठी जमिनीमध्ये नत्र या अन्नद्रव्याचे प्रमाण (२८० ते ४२० किलो प्रतिहेक्टर) हे योग्य असणे खूप गरजेचे आहे.

अधिक वाचा: वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाले तर वन विभागाकडून कशी दिली जाते भरपाई? वाचा सविस्तर

Web Title : मिट्टी में नाइट्रोजन बढ़ाएँ: भूमि की उर्वरता के लिए आसान उपाय

Web Summary : नाइट्रोजन मिट्टी की उर्वरता और फसल की उपज के लिए महत्वपूर्ण है। नाइट्रोजन के स्तर को निर्धारित करने के लिए मिट्टी का परीक्षण करें। खाद और हरी खाद फसलों जैसे जैविक उर्वरकों के माध्यम से स्वाभाविक रूप से नाइट्रोजन बढ़ाएँ। फसल चक्र भी कमी से बचने के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : Boost Soil Nitrogen: Simple Steps for Increased Land Fertility

Web Summary : Nitrogen is crucial for soil fertility and crop yield. Test soil to determine nitrogen levels. Increase nitrogen naturally through organic fertilizers like compost, manure, and green manure crops. Crop rotation is also vital to avoid depletion.