lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना आता घरूनच करता येणार ऑनलाईन अर्ज

जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना आता घरूनच करता येणार ऑनलाईन अर्ज

Farmers can now apply online for land survey from home | जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना आता घरूनच करता येणार ऑनलाईन अर्ज

जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना आता घरूनच करता येणार ऑनलाईन अर्ज

अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे. सातबाऱ्यावरून शेतकऱ्यांची जमीन किती आहे, हे समजते.

अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे. सातबाऱ्यावरून शेतकऱ्यांची जमीन किती आहे, हे समजते.

शेअर :

Join us
Join usNext

अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे. सातबाऱ्यावरून शेतकऱ्यांची जमीन किती आहे, हे समजते. 

मात्र अनेकदा सातबाऱ्यावर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत आढळते, अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हा चांगला पर्याय असून त्यासाठी शेतजमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो.

मोजणीचे तीन प्रकार
१) साधी मोजणी : सहा महिन्यांच्या कालावधीत केली जाते.
२) तातडीची मोजणी : तीन महिन्यांपर्यंत करावी लागते.
३) अति तातडीची मोजणी : दोन महिन्यांच्या आत केली जाते.

असे आहेत दर
एक हेक्टर साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये आणि तातडीच्या मोजणीसाठी दोन तर अति तातडीची मोजणीसाठी तीन हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे किती कालावधीत तुम्हाला मोजणी करून घ्यायची ते आवश्यक आहे.

मोजणी ई प्रणाली काय?
अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई-मोजणी असे म्हटले जाते. सध्या यासंबंधीचे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू आहे.

ई मोजणी आज्ञावलीमध्ये अर्जदार यांना घरबसल्या, सेतुकेंद्रातून खाजगी व्यावसायिक इंटरनेटच्या माध्यमातुन तसेच कार्यालयातुन मोजणीचा अर्ज भरता येतो. प्रस्तुत अर्जाचा टोकन क्रमांक व ७/१२ घेवून भूमि अभिलेख कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज भरुन घेण्याची संपुर्ण कार्यवाही पार पडली जाईल.

मोजणी फी भरल्यानंतर आपला अर्ज कार्यालयात स्विकारला जाईल व तात्काळ आपल्या मोजणी प्रकरणाचा मोजणी रजिष्टर क्रमांक, मोजणीची तारीख, मोजणी कर्मचारी व त्यांचा मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती असलेली पोहोच अर्जदार यांना दिली जाईल.

अधिक माहितीसाठी ह्या वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा. या वेबसाईटवर सध्या तुम्ही अर्ज केल्लेल्या मोजणीची स्थिती पाहता येते लवकरच ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सध्याची मोजणी अर्ज करण्याची पद्धती
मोजणीसाठी अर्ज आणि त्याला लागणारी कागदपत्रे आपल्याला आपल्या शेत जमिनीची आणि त्याच्या अगदी बाबत शंका निर्माण झाल्यास आपण यासाठी सरकारी कार्यालयाकडे दाद मागू शकतो. यासाठी शेतकरी भूमिअभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन कार्यालय यांच्या कार्यालयात तुम्ही अर्ज करू शकतो.

अधिक वाचा: बनावट दस्त नोंदणीसाठी रोखण्यासाठी शक्कल; दस्तांवरील आधार, पॅन, बोटांचे ठसे होणार अदृश्य

Web Title: Farmers can now apply online for land survey from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.