Lokmat Agro >स्मार्ट शेती > Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर

Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर

Farmer id : Now get Farmer ID from your mobile from home; Know the details | Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर

Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर

Farmer id कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दिनांक. १५.०४.२०२५ पासून अनिवार्य करण्यात आले आहे.

Farmer id कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दिनांक. १५.०४.२०२५ पासून अनिवार्य करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत.

त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) देण्यात येत आहे.

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दिनांक. १५.०४.२०२५ पासून अनिवार्य करण्यात आले आहे.

फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरच फार्मर आयडी काढू शकता तो कसा ते पुढे पाहूया.

Farmer Self Registration साठी https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/या लिंकवर क्लिक करुन खालील पद्धतीचा वापर करावा.
१) वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर Farmer यावर क्लिक करा.
२) Create new user account
३) Aadhar E-kyc
४) Submit
५) यानंतर आधार लिंक मोबाईलवरील आलेला OTP टाकायचा.
६) Verify यावर क्लिक करा.
७) शेतकऱ्याची सर्व माहिती दिसेल. येथे Agristack Portal ला जो मोबाईल लिंक करायचा आहे तो टाकायचा.
८) OTP टाकून मोबाईल Verification करायचे.
९) Agristack Profile Password सेट करायचा आहे.
१०) Set Password Confirm Password
११) Create My Account
१२) यानंतर रजिस्ट्रेशन होऊन प्रोफाईल तयार होईल.
१३) नंतर Ok करा.
१४) परत लॉगिन Page येईल Username मध्ये तुमचा मोबाईल नंबर ने Login करायचा आहे.
१५) रजिस्टर As Farmer
१६) Mobile Confirmation (No वर क्लिक करायचा जर मोबाईल बदलायचा नसेल तर)
१७) Farmer ID Form ओपन होईल.
१८) Farmer Details मध्ये पूर्ण नाव टाकणे उर्वरित इतर माहिती भरत जावी.

अधिक वाचा: Dasta Nondani : नोंदणी झालेल्या दस्तात चूक झाली तर ती कशी दुरुस्त करता येते? वाचा सविस्तर?

Web Title: Farmer id : Now get Farmer ID from your mobile from home; Know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.