lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > बांबूपासून होणार इथेनॉल निर्मिती; पेट्रोल, डिझेलला ठरणार पर्याय

बांबूपासून होणार इथेनॉल निर्मिती; पेट्रोल, डिझेलला ठरणार पर्याय

Ethanol production from bamboo; An alternative to petrol, diesel | बांबूपासून होणार इथेनॉल निर्मिती; पेट्रोल, डिझेलला ठरणार पर्याय

बांबूपासून होणार इथेनॉल निर्मिती; पेट्रोल, डिझेलला ठरणार पर्याय

महेश सरनाईक पाच लाख टन बांबूपासून ६ कोटी लिटर इथेनॉल वर्षभरात तयार करणारी जगातील पहिली रिफायनरी नेदरलँड, फिनलँड पाशा ...

महेश सरनाईक पाच लाख टन बांबूपासून ६ कोटी लिटर इथेनॉल वर्षभरात तयार करणारी जगातील पहिली रिफायनरी नेदरलँड, फिनलँड पाशा ...

शेअर :

Join us
Join usNext

महेश सरनाईक
पाच लाख टन बांबूपासून ६ कोटी लिटर इथेनॉल वर्षभरात तयार करणारी जगातील पहिली रिफायनरी नेदरलँड, फिनलँड पाशा पटेल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आसाममध्ये लवकरच सुरू होणार आहे. अशी माहिती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी 'लोकमत'शी संवाद साधताना दिली.

पेट्रोल, डिड्रोलचे साठे भविष्यात संपून जातील. तसेच पेट्रोल, डिझेल जाळल्यामुळे निर्माण होणारा कार्बन आणि त्यातून होणारा तापमान वाढीचा धोका लक्षात घेता भविष्यात इथेनॉलचा पर्याय म्हणून समोर येणार आहे. भारत सरकारसमोर है वास्तव उघड झाल्यामुळे बांबूपासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी ही रिफायनरी काम करणार आहे.

हिमनग वितळण्याचा धोका
मुंबई, कोलकत्ता, चेन्नईसह अनेक देशांमध्ये समुद्र किनारपट्टीवर मानवाने अतिक्रमण करून अनेक शहरे वसविली आहेत. आगामी काही वर्षात या तापमान वाढीचा फटका बसून जगातील सर्व हिमनग वितळणार असून २० ते १५ फूट पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे शहराच्या शहरे या पाण्यात गायब होण्याचा धोका संभवत आहे, कोकण किनारपट्टीवरील अनेक शहरे, गावे, तालुक्याची विकाणे या पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

जगातील सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून घोषित
हे वर्ष जगामध्ये सर्वाधिक तापमानाचे पृथ्वीवरील उष्ण वर्ष म्हणून घोषित झाले आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्रात उष्माघाताने २८ लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे जाहीर झालेले मृत्यू आहेत. मात्र, प्रत्यक्षात यात वाढही असण्याची शक्यता आहे. कार्बनचे प्रमाण कमालीचे वाढत असून २०५० नंतर मानव जातीचे पृथ्वीवर राहणे कठीण आहे.

तुतीकोरीनमध्ये एका दिवसात ९६० मिलिमीटर पाऊस
तापमान वाड, अचानक कमी होणे, अतिवृष्टी होणे यासारखे धोके आता बसू लागले आहेत. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास मागील काही दिवसांपूर्वी चीनचे तापमान वजा ५२.३ सेल्सिअस झाले होते. तर देशातील तामिळनाडू राज्यातील तुतीकोरीन येथे एका दिवसांत तब्बल ९६० मिलिमीटर पाऊस झाला, आणखीन एक उदाहरण द्यायचे झाल्यास लिबिया डेरना देशात एका रात्रीत सध्या लाख लोक वाहून गेले.

भूगर्भातील संपत्ती नष्ट करणे थांबायला हवे
केंद्र शासनाने दगडी कोळसा जाळणे बंद करणे मजबुरी बनली आहे. १ किलो दगडी कोळसा जाळला तर २ किलो ८०० ग्रॅम कार्बन निघतो. पेट्रोल १ लिटर जाळल्यास ३ किलो कार्बन निघतो आणि दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल या सर्व गोष्टी जमिनीच्या पोटातून म्हणजे भूगर्भातून येतात, ८० टक्के ऊर्जा जमिनीच्या पोटातील आहे. पृथ्वीवरची एकमेव सुरक्षित जात मानवजात वाचविण्यासाठी भूर्गभातील ही संपत्ती नष्ट करणे आता थांबले पाहिजे.

शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळावे. राज्य सरकार बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक पावले उचलत आहे. ही समाधानाची बाब आहे. ढासळत्या वातावरण बदलात शाश्वत शेतीचा पर्याय म्हणून बांबू शेतीकडे वळणे ही शेतकऱ्यांसाठी काळाची गरज आहे. - मोहन होडावडेकर, कार्यकारी संचालक, कोकण बांबू अॅण्ड केन डेव्हलपमेंट सेंटर

अधिक वाचा: रोजगार हमी योजनेतून या पिकाला मिळतंय हेक्टरी ७ लाख रुपये अनुदान

Web Title: Ethanol production from bamboo; An alternative to petrol, diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.