Join us

E Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी झाली आहे का नाही? हे बघा आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 17:54 IST

e pik pahani महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर पोहचविण्याचा दृष्टीने सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर पोहचविण्याचा दृष्टीने सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत, रब्बी हंगाम २०२४-२५ साठी शेतकरी स्तरावरील नोंदणीची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२५ होती. यानंतर, सहाय्यक स्तरावरील नोंदणी १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करण्यात आली.

रब्बी हंगाम २०२४-२५ साठी शेतकरी स्तरावरील स्वत: आपण केलेली ई-पीक पाहणी किंवा सहाय्यक स्तरावरील झालेली ई-पीक पाहणी झाली का नाही हे बघण्यासाठी तलाठ्याकडे जायची आवश्यकता नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता कसे ते आपण पुढे पाहूया.

ई-पीक पाहणी झाली का नाही हे पाहण्यासाठी काय कराल?१) खाली दिलेल्या लिंकवरून ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड कराhttps://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en_IN२) डाउनलोड झाल्यानंतर ॲप ओपन करा सगळ्या परमिशन Allow करा.३) पुढे तुम्हाला महसूल विभाग निवडा असे दिसेल त्यात तुम्ही तुमचा महसूल विभाग निवडा.४) त्यानंतर खालील बाणावर क्लिक करा.५) पुढे लॉगीन पद्धत निवडा. ह्यात शेतकरी म्हणून वर क्लिक करा.६) पुढे तुमचा मोबाईल नंबर टाका.७) पुढे तुम्ही तुमचे खाते जोडले असेल तर खाते नंबर निवडा. (खाते नंबर जोडला नसेल तर सर्व माहिती भरून तो जोडा)८) खाते नंबर निवडल्यानंतर ४ अंकी संकेतांक नंबर टाका. (संकेतांक विसरला असेल तर खाली संकेतांक विसरलात? ह्यावर क्लिक करा तुमचा चार अंकी संकेतांक नंबर दिसेल तो तुम्ही वर टाका.)९) संकेतांक नंबर टाकून खालील बाणावर क्लिक करून पुढे गेल्यावर एकूण ६ पर्याय दिसतील.१०) या पर्यायांमध्ये शेवटचा पर्याय गावाचे खातेदारांची पिक पाहणी हा पर्याय निवडा.११) पुढे तुम्हाला तुमच्या गावातील सर्व खातेदारांची नावे दिसतील यात तुमचे नाव शोधून त्यापुढे डोळ्यासारख्या चिन्हावर क्लिक करा तुमची पिक पाहणी झाली का नाही ते कळेल.

टीप: ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी स्वत:च्या मोबाईलवरून केली आहे त्यांना हे पाहणे सोपे जाईल ज्यांना नवीन नोंदणी करून पहायाचे असेल तर त्यांना सर्व माहिती भरून नोंदणी करून ती पहावी लागेल.

टॅग्स :पीकपीक विमासरकारशेतकरीशेतीमोबाइलऑनलाइनरब्बीरब्बी हंगाममहाराष्ट्र