शेतकरी आणि पक्षी यांचे जवळचे नाते आहे. उभ्या पिकावरील कीड नियंत्रणासाठी सध्याच्या विज्ञान युगात शेतकरी महागाडे कीटकनाशक खरेदी करून त्यांची पिकांवर फवारणी करतात.
मात्र तरीही कीड रोगांचा कमी होत नाही. सध्या राज्यात सर्वत्र विविध पक्ष्यांमुळे ज्वारी, हरभरा पिकांवरील कीड, आळींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कावळे, निळकंठ, बगळे, भोरड्या, मैना आदी पक्ष्यांमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
शेतातील कीड नियंत्रणासाठी निसर्गामार्फत पक्ष्यांची मोठी मदत मिळते. भारतीय उपखंडात विविध प्रकारचे कीटक आहेत. या सर्व कीटकांचा अन्न पुरविण्याचे काम वनस्पती व प्राणी यांच्याकडून होते. कीटकांची संख्या मर्यादित राहिली नाही तर शेतीबरोबरच कोणत्याही प्रकारची वनस्पती जिवंत राहणार नाही.
अनेक कीटक दिवसातून दोनवेळा त्यांच्या वजनाइतकेच अन्नग्रहण करतात. कोवळी पाने, फुले खाणाऱ्या अळ्या २४ तासांत त्यांच्या वजनाच्या दोनपट अन्न खातात. त्यांचा गट कधी कधी इतका मोठा असतो की तो काही तासातच एका बहारदार झाडाचे रूपांतर निरुपयोगी अशा रिकाम्या खोडामध्ये करतो.
भोरड्या आणि मैना हे पक्षी त्याच ऋतुमध्ये देशातील वेगवेगळ्या भागात येतात. शिवाय ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांना घातक ठरणाऱ्या कीटकांच्या टोळ्या आणि अळ्या खाऊन किडीपासून होणारे पिकांचे संरक्षण करणाऱ्या पक्ष्यांमध्ये कावळे, नीळकंठ यासारख्या पक्ष्यांचाही समावेश होत असतो. कीटकांची संख्या एका विशिष्ट प्रमाणात नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, शिवाय पक्ष्यांमार्फत हे काम निसर्गात केले जाते.
बदलत्या वातावरणामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. पक्षी हे पिकांवरील कीड नियंत्रणासाठी महत्वाचे ठरतात. शेतकऱ्यांनी हेक्टरी १० पक्षी थांबे उभे केल्यास किडीचे नियंत्रण होण्यास मदत होते. - अक्षय बावणे, कृषी सहाय्यक, दे. फाटा जि. परभणी.