Lokmat Agro >स्मार्ट शेती > Bhat Khod Kid : उन्हाळी भातशेतीवर दिसतोय खोडकिडा; करा हे सोपे जैविक उपाय

Bhat Khod Kid : उन्हाळी भातशेतीवर दिसतोय खोडकिडा; करा हे सोपे जैविक उपाय

Bhat Khod Kid : Summer rice fields are showing signs of stem borer pests; try this simple biological solution | Bhat Khod Kid : उन्हाळी भातशेतीवर दिसतोय खोडकिडा; करा हे सोपे जैविक उपाय

Bhat Khod Kid : उन्हाळी भातशेतीवर दिसतोय खोडकिडा; करा हे सोपे जैविक उपाय

Bhat Khod Kid उन्हाळी, पावसाळी दोन्ही हंगामात भाताचे उत्पादन घेतले जाते. भातशेतीला अपायकारक खोडकिडा असतो. यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.

Bhat Khod Kid उन्हाळी, पावसाळी दोन्ही हंगामात भाताचे उत्पादन घेतले जाते. भातशेतीला अपायकारक खोडकिडा असतो. यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.

शेअर :

Join us
Join usNext

उन्हाळी, पावसाळी दोन्ही हंगामात भाताचे उत्पादन घेतले जाते. भातशेतीत खोडकिड ही प्रमुख कीड आहे. यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.

कीड कशी ओळखावी?
- या किडीचा पतंग १-२ सें.मी. लांब, समोरील पंख पिवळे, मागील पांढरे समोरील पिवळ्या पंखावर प्रत्येकी एक ठळक काळा ठिपका असतो.
- अंडी पुंजक्याच्या स्वरूपात असून पिवळसर तांबडया तंतुमय धाग्याची पानाच्या शेंड्यावर झाकलेले असतात.
- पुर्ण वाढ झालेली अळी २० मि.मि. लांब पिवळसर व पांढरी असते.
- खोडकिडीची मादी १०० ते २०० अंडी पुंजक्यानी, धानाच्या शेंड्यावर घालते.

जीवनक्रम
- अंड्यातून ५ ते ८ दिवसांत अळ्या बाहेर येतात व धानाच्या मुख्य खोडास पोखरुन आतमध्ये उपजीवीका करतात.
- अळी अवस्था १६ ते २७ दिवसाची असते.
- अळी खोडामध्येच कोषावस्थेत जाते आणि ९ ते १२ दिवसात कोषातुन पतंग बाहेर येतो.
- एक जीवनक्रम पुर्ण करण्यास ३१ ते ४० दिवस लागत असून एका वर्षात ४ ते ६ पिढ्या पुर्ण होतात.

नुकसान करण्याची पद्धत
-
अळी खोड पोखरते त्यामुळे रोपाचा गाभा मरतो व फुटवा सुकतो. यालाच किडग्रस्त फुटवा/गाभेमर/डेडहार्ट म्हणतात.
- हा फुटवा ओढल्यास सहज निघून येतो. अशा फुटव्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या येतात. यालाच पळीज/पांढरी पिशी म्हणतात.

आर्थिक नुकसानीची पातळी
१) १ अंडी पुंज प्रति चौ. मी.
२) ५ टक्के सुकलेले फुटवे किंवा ५ टक्के गाभेमर प्रति चौ.मी.
३) १ पतंग प्रति चौ.मी.

खोडकिडीचा कसा कराल बंदोबस्त?
◼️ भात रोवणीपूर्वी रोपांची शेंडे तोडून बांबुच्या टोपलीत जमा करावी व ती टोपली खांबावर टांगावी. त्यामुळे रोपाच्या शेंड्यावर असणारी खोड किडीची अंडी नष्ट होऊन त्यामधुन परजीवी किटकसुद्धा यथावकाश बाहेर पडतील.
◼️ पिकाची वरचेवर पाहणी करून कीड ग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत. हे काम हंगामातून तीन ते चार वेळा करावे.
◼️ शेतात पक्षी थांबे लावावेत.
◼️ ट्रायकोग्रामा जापोनीक्रम या परजीवी किडीचा ५०,००० अंडी प्रति हेक्टरी १० दिवसांच्या अंतराने ३-४ वेळा सोडवीत.
◼️ जैविक नियंत्रणासाठी एकरी ४ कामगंध सापळे लावावेत.
◼️ खोडकिडीच्या जैविक नियंत्रणासाठी 'ट्रायकोग्रॅमा जापोनिकम' या प्रजातीचे १ लाख प्रौढ प्रति हेक्टर आठवड्याचे अंतराने पीक लागणीनंतर एक महिन्यानी चार वेळा प्रसारित करावेत.

अधिक वाचा: आंब्यातील फळकुज, साका आणि फळमाशीसाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

Web Title: Bhat Khod Kid : Summer rice fields are showing signs of stem borer pests; try this simple biological solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.