Join us

Bamboo Farming बांबू हा जणू कल्पवृक्षच; दगडी कोळशाला बांबू हाच पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:58 PM

शेतातील शिल्लक राहिलेल्या बायोमासमधून २००० ते २२०० उष्मांक तयार होतो. मात्र, एक किलो बांबू जाळला तर चार हजार उष्मांक तयार होतो. एक किलो दगडी कोळशातून दोन किलो ८०० ग्रॅम कार्बन उत्सर्जन होते.

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : शेतातील शिल्लक राहिलेल्या बायोमासमधून २००० ते २२०० उष्मांक तयार होतो. मात्र, एक किलो बांबू जाळला तर चार हजार उष्मांक तयार होतो. एक किलो दगडी कोळशातून दोन किलो ८०० ग्रॅम कार्बन उत्सर्जन होते. दगडी कोळशाला पर्याय म्हणून बांबूकडे पाहिले पाहिजे.

१ किलो दगडी कोळशातून ३३ टक्के राख निर्माण होते, तर बांबूमधून केवळ ३ टक्के राख निर्माण होते. असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी 'लोकमत' शी संवाद साधताना व्यक्त केले. पाशा पटेल म्हणाले, आता दगडी कोळशात पाच टक्के बायोमास वापरायचा आहे.

त्यामुळे या केवळ पाच टक्क्यांमध्ये १ लाख ५ हजार मेट्रिक टन बायोमासची गरज आहे. त्यामुळे त्यातून ४०० लाख मेट्रिक टन बायोमास केवळ ५ टक्के वापरांतर्गत गरज आहे. आगामी चार ते पाच वर्षांत बायोमास १०० टक्क्यांवर वापरावा लागणार आहे.

बांबू हा जणू कल्पवृक्षचएक झाड सार्वसाधारणपणे ३२० किलो ऑक्सिजन देते. मानवाला २८० किलो ऑक्सिजन लागतो, कार्बन हा मानवाचा दुश्मन आहे. कार्बनच्या वाढीमुळे तापमान वाढ कमी करण्यासाठी ऑक्सिजन शीघ्रगतीने हवेत मिसळणे आवश्यक आहे. यासाठी यांबू बहुपयोगी ठरतो. मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या तीनही गरजा भागविण्याची ताकद बांबूमध्ये आहे. प्राप्त परिस्थितीत मानवजात टिकविण्यासाठी कल्पवृक्ष म्हणजे बांबू आहे.

पीक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी समितीतापमानवाडीचा फटका कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी या फळांनाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यामुळे पारंपरिक उत्पादन घेताना अडचणी येत आहेत आणि त्यातून फटका चसून उत्पादन घटत आहे. त्यामुळे पीक पद्धतीत बदल ३३% राख तयार होते बांबूमधून करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने पीक पद्धतीत बदल करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीतही पाशा पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून टास्क फोर्सची निर्मितीराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बांबू लागवडीबाबत अभ्यास करून निर्णय घेतले आहेत. यासाठी टास्क फोर्सची निर्मिती केली, यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ९ मंत्र्यांचा समावेश आहे. तर समितीतर्गत एक कार्यकारी समिती नेमून त्याचे अध्यक्षपद पाशा पटेल यांना दिले आहे.

बायोमासमध्ये बांबूचा समावेशकेंद्र शासनाच्या बायोमासच्या यादीत बांबूचा समावेश नव्हता. मात्र, बांबूची उपयुक्तता आणि त्याचा वापर लक्षात घेऊन त्याबाबत योग्य ते प्रेझेंटेशन देऊन वेगवेगळ्या पातळीवर सरकारी अधिकाऱ्यांनी बांबूशी संबंधित मानसिकता तयार करून सरकारला बायोमासमध्ये बांबूचा समावेश करायला भाग पाडले.

● दगडी कोळशाला पर्याय म्हणून बांबूकडे पाहिले पाहिजे. १ किलो दगडी कोळशातून ३३ टक्के राख निर्माण होते, तर बांबूमधून केवळ ३ टक्के राख निर्माण होते.

बांबू लागवड सर्वच बाबतीत फायदेशीर अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. त्यामुळे तापमानवाढीचा फटका बसून फळबागांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या जमिनीत जर बांबू लागवड केली तर बांबूला फळही नाही आणि फूलही नाही. मात्र त्यातून भरघोस उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी, बागायतदारांनी ७ लाखांच्या अनुदानाचा फायदा घेऊन बांबू लागवड करणे आवश्यक आहे. - अशोक करंबेळकर, कणकवली

अधिक वाचा: बांबूपासून होणार इथेनॉल निर्मिती; पेट्रोल, डिझेलला ठरणार पर्याय

टॅग्स :शेतीशेतकरीकोकणआंबासरकारमुख्यमंत्रीराज्य सरकारपाशा पटेलएकनाथ शिंदे