Lokmat Agro >स्मार्ट शेती > Artificial Intelligence in Agriculture शेती क्षेत्रात कसा होतो एआय चा वापर

Artificial Intelligence in Agriculture शेती क्षेत्रात कसा होतो एआय चा वापर

Artificial Intelligence in Agriculture; How AI is used in agriculture sector | Artificial Intelligence in Agriculture शेती क्षेत्रात कसा होतो एआय चा वापर

Artificial Intelligence in Agriculture शेती क्षेत्रात कसा होतो एआय चा वापर

प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवरील रोग आणि विषाणूंची सर्वाधिक भीती असते. अनेकदा ते समजून घेण्यात कमी पडल्याने आणि वेळीच काळजी न घेतल्याने नुकसान सहन करावे लागतर, यामुळे शेतीची सुरक्षितता वाढेल आणि परिणामी उत्पन्नही वाढण्यास मदत होईल.

प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवरील रोग आणि विषाणूंची सर्वाधिक भीती असते. अनेकदा ते समजून घेण्यात कमी पडल्याने आणि वेळीच काळजी न घेतल्याने नुकसान सहन करावे लागतर, यामुळे शेतीची सुरक्षितता वाढेल आणि परिणामी उत्पन्नही वाढण्यास मदत होईल.

शेअर :

Join us
Join usNext

भारतीय कृषी हवामान हे प्रदेशानुसार बदलत राहते; त्यामुळे एआय प्रणीत साहित्य सर्व भागांत राबवणे आव्हानात्मक आहे; परंतु या प्रणालीचा जास्त वापर शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी होईल तितकाच तो फायदेशीर ठरेल. शेतीमध्ये सिंचन खते, कीटकनाशकांचा वापर स्वयंचलितप्रमाणे होऊ शकतो. 'एआय'च्या मदतीने तुम्ही शेतात वेळ आणि कष्ट वाचवू शकता.

सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता 'एआय'ने प्रत्येक क्षेत्रात आपली उपस्थिती नोंदवली आहे. व्हिडीओ, फोटो, कटेंट राइटिंग, इंटेरिअर डिझाइन किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो; याचा वापर सर्वत्र दिसून येतोच. कृत्रिम क्षेत्रातही याच्या मदतीने बरेच काही करता येते आणि यावर कामही सुरू झाले आहे.

भारत हा कृषिप्रधान देश असल्याने बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहे. भारतीय हवामानही सतत बदलत असल्याने हवामानाचा अंदाज लावणे जमत नाही. 'एआय'च्या मदतीने हवामानाचा अंदाज वर्तविण्यापासून ते झाडांना केव्हा आणि किती खत व पाण्याची गरज आहे, हे ठरवणे शक्य आहे.

'एआय'च्या वापराने डेटा विश्लेषण डेटा आणि लेटेस्टसाठी केला जातो. त्याचा वापर कृषिक्षेत्रासाठी करता येत आहे. हवामान त्या प्रदेशातील मातीचा प्रकार, पाणी आणि सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा परिणाम समजण्यास मदत होणार आहे.

डेटा अॅनॅलिटिक्समुळे शेतकऱ्यांना कोणत्या वेळी, कोणत्या संसाधनांचा वापर करायचा, त्यासाठी पिकांसाठी कोणता निर्णय घ्यायचा, कोणती रसायने, किती प्रमाणात वापरायची, हे समजू शकेल, मशागत करताना सुधारणेला वाव असेल.

हवामानाचा अंदाज, मातीचे विश्लेषण, पाण्याचा वापर आणि कोणत्या प्रकारचे बियाणे निवडायचे याबाबत मदत होईल. यासोबतच कीटकनाशकांच्या वापराशी संबंधित निर्णयही सहज घेता येतात. याची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'मशिन लर्निंग', मशिन लर्निंग अल्गोरिदम प्रशिक्षण घेऊन कृषी क्षेत्रात सर्व प्रकारचे निर्णय सहज घेता येतात.

या निर्णयांमध्ये उत्पादन, कीटकनाशके, रोग व्यवस्थापन आणि शेतीशी संबंधित इतर समस्यांवर काम करता येईल. 'एआय'च्या मदतीने शेतीची अनेक कामे स्वयंचलित करता येतात. त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल.

यामध्ये अनेक प्रकारच्या सेन्सर्स आणि उपकरणांची मदत घेतली जाऊ शकते. ज्यामुळे शेतीमध्ये सिंचन खते आणि कीटकनाशकांचा वापर स्वयंचलितप्रमाणे होऊ शकतो. 'एआय'च्या मदतीने तुम्ही शेतात वेळ आणि कष्ट वाचवू शकता.

प्लॅन्टिक्स
हे एआय प्रचलित साधन मातीतील पोषक द्रव्यांची कमतरता ओळखण्यास मदत करते. त्यावरून कोणती कीटकनाशके वापरायची याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो; त्यामुळे पिकांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. हे एआय मोबाइलवरही चालवता येते. शेतकरी त्यांच्या फोनवर पिकांचे फोटो काढून स्कॅन करू शकतात.

गमाया
हे टूल शेतातील पिके सहन करणे, त्रुटी ओळखणे, निदान करणे, पोषक द्रव्यांची कमतरता ओळखणे आणि पिकांसाठी कीटकनाशके आणि फवारणीबाबत सल्ला देते.

एरोबेटिक्स
हे एआय साधन शेतकऱ्यांना पिकांची सध्याची स्थिती ओळखून साधारण उत्पन्नाची माहिती देते, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या उत्पन्नाचा अंदाज येईल.

अॅगव्हॉइस
हे दोन्ही नियंत्रित साधन प्रमाणात डाटा जमा करणे, शेतीमध्ये फवारणी करणे, जमिनीचे मोजमाप करणे, फवारणीचे नियोजन करण्यासाठी मदत करते.

प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवरील रोग आणि विषाणूंची सर्वाधिक भीती असते. अनेकदा ते समजून घेण्यात कमी पडल्याने आणि वेळीच काळजी न घेतल्याने नुकसान सहन करावे लागतर, यामुळे शेतीची सुरक्षितता वाढेल आणि परिणामी उत्पन्नही वाढण्यास मदत होईल.

भारतीय हवामान हे सतत बदलत असल्याने तेच पूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा धोकादेखील असतो. अशामुळे यावर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही.

डॉ. अमेय पांगारकर
एआय तज्ञ

अधिक वाचा: BBF Sowing रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणीचे असे होतात फायदे

Web Title: Artificial Intelligence in Agriculture; How AI is used in agriculture sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.