lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > बिरोबावाडीच्या रासकरांच्या भगव्या डाळिंबाची नेपाळ, बांगलादेशात हवा

बिरोबावाडीच्या रासकरांच्या भगव्या डाळिंबाची नेपाळ, बांगलादेशात हवा

Pomegranate of farmer Raskars from Birobawadi get good market in Nepal, Bangladesh | बिरोबावाडीच्या रासकरांच्या भगव्या डाळिंबाची नेपाळ, बांगलादेशात हवा

बिरोबावाडीच्या रासकरांच्या भगव्या डाळिंबाची नेपाळ, बांगलादेशात हवा

बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकरी संजीव रासकर यांनी त दिड एकर क्षेत्रात ५५० भगवा जातीची डाळिंबाची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नेपाळ बांगलादेशात निर्यात केली जातात तर महाराष्ट्र तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कलकत्ता या राज्यात हे डाळिंब पाठवले जातात.

बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकरी संजीव रासकर यांनी त दिड एकर क्षेत्रात ५५० भगवा जातीची डाळिंबाची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नेपाळ बांगलादेशात निर्यात केली जातात तर महाराष्ट्र तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कलकत्ता या राज्यात हे डाळिंब पाठवले जातात.

शेअर :

Join us
Join usNext

मनोहर बोडखे
बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकरी संजीव रासकर यांनी त दिड एकर क्षेत्रात ५५० भगवा जातीची डाळिंबाची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नेपाळ बांगलादेशात निर्यात केली जातात तर महाराष्ट्र तामिळनाडू, आंध्र प्रदेश कलकत्ता या राज्यात हे डाळिंब पाठवले जातात.

भगवा जातीचे डाळिंब खाण्यासाठी गोड असतात हे डाळिंब बागेतून तोडल्यानंतर जास्त काळ टिकते आणि खाण्यास गोड असल्यामुळे या डाळिंबाच्या शेतीकडे संजीव रासकर यांचा कल असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून फळांची शेती करावी असा निश्चय संजीव रासकर यांनी केला त्यानुसार डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम २०१९ मध्ये दीड एकरात डाळिंबाची शेती केली या शेतीची शास्रोक्त पद्धतीने या शेतीची देखभाल केली.

जोपासना करून सप्टेंबर २०२३ या वर्षात डाळिंबाचे वीस टन उत्पन्न घेतले. मात्र यात ना नफा ना तोटा झाला परंतु जिद्द सोडली नाही. डाळिंबाच्या शेतीविषयक त्यांना विचारले असता रासकर म्हणाले की जमीन मध्यम हलकी व पाण्याचा चांगला निचरा होणारी, सामू ६.५ ते ८ पर्यंत असणारी लागते हे पाहून त्यांनी त्यांच्या एकूण जमीनी पैकी दिड एकर जमीन निश्चित केली.

त्यामध्ये १५ बाय १० फुटावर ट्रॅक्टरने दीड फूट खोल सरी काढून रोप लागणीची आखणी केली. सरी मध्ये प्रथम फोलिडॉल पावडर व थाईमेट टाकून त्यावर शेजारील तापलेली माती भरून घेतली. त्यावर चांगले कुजलेले शेणखत एक घमेले टाकून खड्डे भरून घेतले.

वळवाचे दोन पाऊस झाल्यावर खड्डयातील माती खाली बसल्यामुळे खड्डे स्पष्ट दिसू लागले. त्यामध्ये भगवा जातीची डाळिंबाची निरोगी रोपे आणून सप्टेंबर २०१९ ला लागण केली. त्याला ठिंबक केले. एक ते दिड महिन्यात रोपांची चांगली वाढ सुरू झाली. त्याला दर दिड ते दोन महिन्यात बुडात खुरपणी करून काळजीपूर्वक छाटणी करून योग्य आकार दिला.

किडरोग पाहून आवश्यकते नुसार कीटकनाशके वापरली. खतांच्या योग्य मात्रा दिल्या. त्यामुळे सप्टेंबर २०२१ मध्ये पहिले उत्पादन चार टन झाले. त्यातून खर्च भागला. नंतर २०२२ या वर्षात दुसरा बहार सात टन निघाला. त्यामध्ये खर्च भागून दोन लाखाचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला त्यानुसार डाळिंबाच्या शेतीकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील व्यापारांचे मदतीने उत्पादित केलेले डाळिंब बांग्लादेश, नेपाळ, या देशांसह इतर राज्यात विक्री साठी गेली. बागेची जोपासना करण्यासाठी संजीव रासकर यांना त्यांचे वडील. पांडुरंग रासकर, विशाल कापडणीस, राजकुमार तावरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांना पत्नी संगीता आणिमुलगा अभिषेक यांची मदत होत असते.

नुकसान टाळण्यासाठी बागेवर क्रॉप कव्हर
डाळिंबाच्या बागेवर क्रॉप कव्हर टाकण्यात आलेली आहे की जेणेकरून डाळिंबाची शेती संपूर्णपणे झाकली जाते. तसेच रोग आणि उन्हाचा प्रादुर्भाव होत नाही. परिणामी डाळिंबाचे नुकसान होत नाही. किडरोग पाहून आवश्यकते नुसार कीटकनाशके वापरली. खतांच्या योग्य मात्रा दिल्या. त्यामुळे सप्टेंबर २०२१ मध्ये पहिले उत्पादन चार टन झाले.

अधिक वाचा: तुर्की बाजरीने केली कमाल ढेकळवाडीचे शेतकरी नानासाहेब झाले मालामाल

Web Title: Pomegranate of farmer Raskars from Birobawadi get good market in Nepal, Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.