Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain : राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला, या धरणांमधून विसर्ग, वाचा सविस्तर

Maharashtra Rain : राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला, या धरणांमधून विसर्ग, वाचा सविस्तर

Latest news Water storage in dams in maharashtra has increased, discharge from dams, read in detail | Maharashtra Rain : राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला, या धरणांमधून विसर्ग, वाचा सविस्तर

Maharashtra Rain : राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला, या धरणांमधून विसर्ग, वाचा सविस्तर

Maharashtra Rain : राज्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Maharashtra Rain : राज्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain : राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी (Jagbudi River) इशारा पातळीवर आहे. पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण (Khadakwasala Dam) मुठा नदी १५,०९२ क्युसेक, बंडगार्डन बंधारा पुणे-२४,४१६ क्युसेक, भीमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा ५०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. 

तसेच नाशिक जिल्ह्यातील (Nashik Distict Dam) अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून ४७४२ क्युसेक, गंगापूरमधून (Gangapur Dam) ११६० क्युसेक, कादवा धरणातून ५३० क्युसेक, पालखेड धरणातून २९५० क्युसेक, तर नांदूरमधमेश्वर धरणातून १२,६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सीना नदी - सीना धरणातून २८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.  वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्यालगत गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात लक्षणीय वाढ झाली असून, ७० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उजनीची पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, गोसीखुर्द प्रकल्पामध्ये सध्या ११०.१५४ दशलक्ष घनमीटर (१४.८८ टक्के) जिवंत साठा आहे. शनिवारी सकाळी धरणाची पाणीपातळी २४१.६४० मीटर नोंदली गेली. प्रकल्पाची उच्चतम पाणीपातळी २४५.५०० मीटर आहे.  जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, २० जून रोजी सायंकाळी ६ वाजतापासून गोसेखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वैनगंगा नदीत ८० क्युमेक पाणी सोडण्यात आले आहे. 

जायकवाडीसाठी दोन दिवसांत २००० दलघफू
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू असून, त्यातून जायकवाडीसाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत १५३० दलघफू पाणी सोडण्यात आले होते. तर त्यानंतर दिवसभर सुरू असलेल्या विसर्गामुळे शुक्रवारी रात्रीपर्यंत एकूण २ हजार दलघफू पाणी जायकवाडीकडे झेपावले होते.

सध्याची पावसाची ही स्थिती कशामुळे? अन् सोयाबीन, मकाबाबत महत्वाचं आवाहन

Web Title: Latest news Water storage in dams in maharashtra has increased, discharge from dams, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.