Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market : सोयाबीन दरात जबरदस्त उसळी; शेतकऱ्यांना मोठा धक्का की दिलासा?

Soybean Market : सोयाबीन दरात जबरदस्त उसळी; शेतकऱ्यांना मोठा धक्का की दिलासा?

latest news Soybean Market: Huge jump in soybean prices; Big shock or relief for farmers? | Soybean Market : सोयाबीन दरात जबरदस्त उसळी; शेतकऱ्यांना मोठा धक्का की दिलासा?

Soybean Market : सोयाबीन दरात जबरदस्त उसळी; शेतकऱ्यांना मोठा धक्का की दिलासा?

Soybean Market : सोयाबीन बाजारात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, अमरावतीत दराने पहिल्यांदाच हमीभाव ओलांडत ५,५५० रुपये प्रति क्विंटलचा उच्चांक गाठला आहे. तेलाच्या दरवाढीचा परिणाम, पशुखाद्य 'डीओसी'ची (DOC) वाढती मागणी आणि बाजारातील घटलेली आवक यामुळे सोयाबीनला जबरदस्त उठाव मिळत आहे. मात्र, दरवाढ झाली असली तरी बहुतेक शेतकऱ्यांकडे साठवणुकीतील माल नसल्याने या वाढीचा प्रत्यक्ष फायदा कोणाला होतोय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.(Soybean Market)

Soybean Market : सोयाबीन बाजारात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, अमरावतीत दराने पहिल्यांदाच हमीभाव ओलांडत ५,५५० रुपये प्रति क्विंटलचा उच्चांक गाठला आहे. तेलाच्या दरवाढीचा परिणाम, पशुखाद्य 'डीओसी'ची (DOC) वाढती मागणी आणि बाजारातील घटलेली आवक यामुळे सोयाबीनला जबरदस्त उठाव मिळत आहे. मात्र, दरवाढ झाली असली तरी बहुतेक शेतकऱ्यांकडे साठवणुकीतील माल नसल्याने या वाढीचा प्रत्यक्ष फायदा कोणाला होतोय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.(Soybean Market)

अमरावती : राज्यातील सोयाबीनबाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत असून, अमरावती बाजार समितीत सोयाबीनने पहिल्यांदाच हमीभावाचा टप्पा ओलांडत उच्चांकी ५,५५० रुपये प्रति क्विंटल दर गाठला आहे.(Soybean Market)

तेलाच्या दरातील वाढ, पशुखाद्य 'डीओसी'ला (DOC) आलेला उठाव आणि बाजारातील कमी आवक या तिन्ही घटकांच्या एकत्रित परिणामामुळे ही दरवाढ झाल्याचे चित्र आहे.(Soybean Market)

हमीभावाच्या पुढे बाजारभाव

यंदा केंद्र सरकारने सोयाबीनसाठी ५,३२८ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला होता. मात्र, हंगामाच्या सुरुवातीला बाजारभाव ४,५०० रुपयांपर्यंत खाली स्थिरावल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

अनेकांनी दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केली, तर आर्थिक अडचणीमुळे काहींना कमी भावातच विक्री करावी लागली.

अतिवृष्टीचा फटका, उत्पादन घटले

यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने उत्पादनात घट झाली. परिणामी बाजारात आवक कमी राहिली आणि मागणी वाढत गेल्याने दराला आधार मिळाला.

नाफेड खरेदी उशिरा; शेतकऱ्यांचे नुकसान

शासनाच्या नाफेड (NAFED) मार्फत खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यात अडचणी आल्या. दर वाढतील की नाही, या संभ्रमात अनेकांनी साठवलेला माल आधीच विकून टाकला. त्यामुळे सध्या दरवाढ झाली असली तरी बहुसंख्य शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होताना दिसत नाही.

दरवाढीमागची प्रमुख कारणे

* खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ

* पशुखाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोयापेंड (DOC) दरात वाढ (४,२०० रु.–४,३०० रु.)

* बाजारात सोयाबीनची आवक घट

* पावसाळ्यापूर्वी तेल गिरण्यांची वाढती खरेदी (५,७०० रु. पर्यंत व्यवहार)

व्यापाऱ्यांच्या मते, या सर्व कारणांमुळे सोयाबीनला सध्या चांगला उठाव मिळत आहे.

बाजारभावातील वाढ (रु./क्विंटल)

१० एप्रिल : ४,८०० – ५,३५०

१३ एप्रिल : ५,००० – ५,४००

१५ एप्रिल : ५,००० – ५,४००

१७ एप्रिल : ५,००० – ५,३५०

२० एप्रिल : ५,००० – ५,५००

२१ एप्रिल : ५,००० – ५,५५०

सध्या तेलाचे दर वाढल्याने सोयाबीनची मागणी वाढली आहे. त्यातच आवक कमी असल्यामुळे बाजारात उठाव येऊन दरात वाढ झाली आहे.- अमर बांबल, अमरावती बाजार समितीतील अडते

शेतकऱ्यांसाठी मिश्र स्थिती

खरीप पेरणीच्या तोंडावर दरवाढ झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी साठवणुकीतील सोयाबीन फारच कमी शेतकऱ्यांकडे उरले आहे. त्यामुळे सध्याच्या उच्च दराचा फायदा मर्यादित शेतकऱ्यांनाच होत असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन बाजारात मोठा ट्विस्ट; दर वाढले, पण फायदा कुणाला?

अधिक वाचा : Dhanya Bajarbhav : आखाती युद्धाचा थेट परिणाम; सोयाबीन-तूर तेजीत, गव्हातही सुधारणा वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन ने छुआ रिकॉर्ड स्तर: ₹5550, किसानों को थोड़ी राहत।

Web Summary : तेल की कीमतों और पशु आहार की मांग बढ़ने से सोयाबीन की कीमतें ₹5550 तक पहुंच गईं। अत्यधिक बारिश से फसल को नुकसान होने के बावजूद, संग्रहीत सोयाबीन वाले किसानों को सरकारी खरीद में देरी के बीच कुछ राहत मिल रही है।

Web Title : Soybean hits record high: ₹5550, farmers see slight relief.

Web Summary : Soybean prices surged to ₹5550 due to rising oil prices and demand for animal feed. Despite crop damage from excessive rain, farmers with stored soybeans are experiencing some relief amid delayed government procurement.