Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market : सोयाबीन बाजारात मोठा ट्विस्ट; दर वाढले, पण फायदा कुणाला?

Soybean Market : सोयाबीन बाजारात मोठा ट्विस्ट; दर वाढले, पण फायदा कुणाला?

latest news Soybean Market: Big twist in the soybean market; Prices increased, but who benefits? | Soybean Market : सोयाबीन बाजारात मोठा ट्विस्ट; दर वाढले, पण फायदा कुणाला?

Soybean Market : सोयाबीन बाजारात मोठा ट्विस्ट; दर वाढले, पण फायदा कुणाला?

Soybean Market : गेल्या काही महिन्यांपासून दबावात असलेले सोयाबीनचे दर आता अचानक उसळी घेत ५,५०० रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत. दर वाढताच शेतकऱ्यांनी साठवलेला माल बाजारात आणण्यास सुरुवात केली असून, बाजार समित्यांमध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. (Soybean Market)

Soybean Market : गेल्या काही महिन्यांपासून दबावात असलेले सोयाबीनचे दर आता अचानक उसळी घेत ५,५०० रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत. दर वाढताच शेतकऱ्यांनी साठवलेला माल बाजारात आणण्यास सुरुवात केली असून, बाजार समित्यांमध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. (Soybean Market)

Soybean Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला कमाल ५,५९५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

त्याचबरोबर तुरीलाही ८,१८० रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दर वाढताच बाजारातील आवकही लक्षणीयरीत्या वाढली आहे.

दर वाढताच 'स्टॉक क्लिअरन्स सेल'

दर साडेपाच हजारांच्या पुढे जाताच शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे.

वाशिम जिल्ह्यात सोमवारी सहा प्रमुख बाजार समित्यांमध्ये सुमारे १६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

कारंजा : ४,५०० क्विंटल

रिसोड : १,७०० क्विंटल

मानोरा : २५० क्विंटल

दर वाढीचा फायदा मिळवण्यासाठी शेतकरी आता विक्रीकडे वळल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मागील तीन वर्षांची पार्श्वभूमी

गेल्या तीन वर्षांत सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांची मोठी परीक्षा घेतली. सतत कमी दर आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली.

डिसेंबर २०२५ पर्यंत सोयाबीनचे दर ४,००० रुपयांच्या खाली गेले होते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

मात्र, जानेवारी २०२६ पासून दरात सुधारणा होऊन ते ५,१०० रुपयांपर्यंत पोहोचले. मार्चमध्ये थोडी घसरण झाली असली, तरी एप्रिलमध्ये पुन्हा तेजी आली आहे.

दर वाढले, पण फायदा कोणाला?

दर वाढले असले, तरी त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही.

ज्यांनी दरवाढीची वाट पाहत सोयाबीन साठवून ठेवला, त्यांनाच फायदा

अनेक शेतकऱ्यांनी आधीच कमी दरात माल विकल्याने ते या वाढीपासून वंचित

भाववाढीची प्रमुख कारणे

उत्पादनात घट – अपेक्षेपेक्षा कमी उत्पादनामुळे बाजारात मालाची उपलब्धता घटली

मागणीत वाढ – खाद्यतेल उद्योगाकडून सोयाबीनला वाढती मागणी

आंतरराष्ट्रीय परिणाम – जागतिक खाद्यतेल दरातील चढ-उतार व आयातीवरील परिणाम

व्यापाऱ्यांची साठवणूक – साठवलेला माल टप्प्याटप्प्याने बाजारात येत असल्याने दर टिकून

सोयाबीनच्या दरात आलेली सध्याची तेजी शेतकऱ्यांसाठी सकारात्मक संकेत असली, तरी सर्वांनाच त्याचा समान लाभ मिळालेला नाही. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या विक्रीकडे वळले असून, पुढील काही दिवसांत दरातील चढ-उतारावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Dhanya Bajarbhav : आखाती युद्धाचा थेट परिणाम; सोयाबीन-तूर तेजीत, गव्हातही सुधारणा वाचा सविस्तर

अधिक वाचा : Chia Seed Market : हळद विकावी की थांबावी? चियाच्या तेजीने बदलली गणितं

Web Title : सोयाबीन बाजार में उछाल: कीमतें बढ़ीं, लेकिन फायदा किसे?

Web Summary : महाराष्ट्र में सोयाबीन की कीमतें बढ़ी हैं, जिससे उन किसानों को राहत मिली है जिन्होंने अपना उत्पादन संग्रहीत किया था। बाजार में आवक में वृद्धि 'स्टॉक क्लीयरेंस सेल' का संकेत देती है। कुछ को उछाल से फायदा होता है, कई पहले की बिक्री के कारण चूक गए। उत्पादन में गिरावट और मांग से कीमतों में वृद्धि हुई है।

Web Title : Soybean Market Surge: Prices Rise, But Who Benefits?

Web Summary : Soybean prices are up in Maharashtra, offering relief to farmers who stored their produce. Increased market arrivals signal a 'stock clearance sale.' While some benefit from the surge, many missed out due to earlier sales. Production decline and demand drive price increases.