Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Sugarcane Rate : सातपुडा, ओंकार शुगरतर्फे उसाला प्रतिक्विंटल 2800 रुपयांचा भाव, वाचा सविस्तर 

Sugarcane Rate : सातपुडा, ओंकार शुगरतर्फे उसाला प्रतिक्विंटल 2800 रुपयांचा भाव, वाचा सविस्तर 

Latest news Satpuda, Omkar Sugar factory sells sugarcane at Rs 2,800 per quintal, read details | Sugarcane Rate : सातपुडा, ओंकार शुगरतर्फे उसाला प्रतिक्विंटल 2800 रुपयांचा भाव, वाचा सविस्तर 

Sugarcane Rate : सातपुडा, ओंकार शुगरतर्फे उसाला प्रतिक्विंटल 2800 रुपयांचा भाव, वाचा सविस्तर 

Sugarcane Rate : आज उसाचे पेमेंट जमा करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती सातपुडा कारखाना प्रशासनाने पत्रकार परिषदेतून दिली. 

Sugarcane Rate : आज उसाचे पेमेंट जमा करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती सातपुडा कारखाना प्रशासनाने पत्रकार परिषदेतून दिली. 

शेअर :

Join us
Join usNext

नंदुरबार : शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील सातपुडा साखर कारखाना (Satpuda Sakhar Karkhana) संचालित ओंकार शुगर लिमिटेडतर्फे उसाला प्रतिक्विंटल २ हजार ८०० रुपये भाव जाहीर करण्यात आला आहे. दि. ३१ डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला आहे. त्यांच्या बँक खात्यात चार जानेवारी रोजी उसाचे पेमेंट जमा करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती सातपुडा कारखाना प्रशासनाने पत्रकार परिषदेतून दिली. 

सातपुडा साखर कारखाना यंदा उसाला काय दर (Sugarcane Rate) देणार याकडे खान्देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. जिल्ह्यातील तीन साखर कारखाने व तीन खांडसरी मार्फत ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने सातपुडा कारखान्याला गाळपाची परवानगी दिली आहे. यावेळी माहिती देताना चेअरमन दीपक पाटील यांनी, सातपुडा कारखाना व ओंकार शुगर यांच्यातर्फे गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. 

यापूर्वी शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट थकले होते ते सर्व अदा केले आहे. कारखाना पूर्ववत सुरू करण्यात यश आले आल्याचे सांगितले. बाबूराव बोत्रेपाटील यांनी, सातपुडा साखर कारखान्याचे व्यवहार पूर्ववत सुरू आहेत. दि. ३१ डिसेंबरपर्यंत ज्यांनी ऊस दिला आहे. त्यांना त्यांच्या बँक खात्यात दि. ४ जानेवारीपर्यंत पैसे जमा करण्यात येईल. 

कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करणार

शेतकरी कारखान्याला ऊस देतील त्यांना दर महिन्याच्या पाच आणि २० तारखेला रक्कम अदा करण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२५ ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना १०० रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान देण्यात येणार आहे. शेतकरी जेवढा ऊस पुरवतील त्यांना तेवढी साखर दिवाळीला मोफत देण्यासह कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, बाजार समितीचे संचालक मयूर पाटील उपस्थित होते.

Web Title: Latest news Satpuda, Omkar Sugar factory sells sugarcane at Rs 2,800 per quintal, read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.