Lokmat Agro >स्मार्ट शेती > Banana Thrips : केळी पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव, नियंत्रणासाठी 'हा' उपाय करा

Banana Thrips : केळी पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव, नियंत्रणासाठी 'हा' उपाय करा

Latest News kelivar fulkide Infestation of flower bugs on banana crop, how to control see details | Banana Thrips : केळी पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव, नियंत्रणासाठी 'हा' उपाय करा

Banana Thrips : केळी पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव, नियंत्रणासाठी 'हा' उपाय करा

Banana Thrips : केळी पिकावरील फुलकिड्यांच्या (thrips) व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

Banana Thrips : केळी पिकावरील फुलकिड्यांच्या (thrips) व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Banana Thrips : केळी पिकावरील फुलकिड्यांच्या (thrips) व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यावर उपाय करणे क्रमप्राप्त ठरते, अन्यथा केळी बागेला पूर्ण प्रादुर्भाव होऊन आर्थिक नुकसान होते. या फुलकिडीच्या नियंत्रणासाठी काय करावे? हे समजून घेऊयात... 

  • केळी पिकावरील फुलकिडीचे व्यवस्थापन

 

नुकसानीचा प्रकार

  • पिल्ले आणि प्रौढ दोघेही फळांचा पृष्ठभाग खरवडतात. 
  • त्यामुळे केळीवर लालसर तपकिरी अंडाकृती डाग पडतात, हे डाग पूर्ण फळावर पसरू शकतात.
  • जास्त प्रादुर्भावामुळे, साल फुटते आणि उघडे पडलेला भाग त्वरीत खराब होते.

 

असे करा व्यवस्थापन

  • सर्व आपोआप उगवलेली झाडे आणि जुन्या दुर्लक्षित बागा नष्ट करा.
  • लागवडीसाठी निरोगी व कीडमुक्त कंदाचा वापर करावा.
  • घड झाकावे. नुकसानीची खात्री करण्यासाठी फळांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
  • घड, खोड व कंद यावर क्लोरपायरीफॉस २० ईसी @ २.५ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • ढालकिडा (लेडीबर्ड बीटल) सारख्या परभक्षी किटकाचा वापर करावा.

 

- फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉटसॅप), किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

Web Title: Latest News kelivar fulkide Infestation of flower bugs on banana crop, how to control see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.