Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : कांद्याला मार्केटमध्ये उठावच नाही; विकायचा तरी कुणाला?

Kanda Market : कांद्याला मार्केटमध्ये उठावच नाही; विकायचा तरी कुणाला?

latest news Kanda Market: There is no need to raise onions in the market; who wants to sell them? | Kanda Market : कांद्याला मार्केटमध्ये उठावच नाही; विकायचा तरी कुणाला?

Kanda Market : कांद्याला मार्केटमध्ये उठावच नाही; विकायचा तरी कुणाला?

Kanda Market : कांदा मार्केटमध्ये सध्या मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दर केवळ ६ ते ७ रुपये प्रतिकिलोवर आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. बाजारात उठाव नसल्यामुळे कांदा शेतातच पडून असून, खरेदीसाठी व्यापारीही पुढे येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.(Kanda Market)

Kanda Market : कांदा मार्केटमध्ये सध्या मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दर केवळ ६ ते ७ रुपये प्रतिकिलोवर आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. बाजारात उठाव नसल्यामुळे कांदा शेतातच पडून असून, खरेदीसाठी व्यापारीही पुढे येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.(Kanda Market)

खामगाव : यंदाच्या रब्बी हंगामात खामगाव तालुक्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असली, तरी बाजारात दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट गडद झाले आहे.(Kanda Market)

सध्या कांद्याला केवळ ६ ते ७ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.(Kanda Market)

५,२५९ हेक्टरवर लागवड; उत्पादन वाढले पण दर घसरले

तालुक्यात यंदा तब्बल ५,२५९ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली. लागवड क्षेत्र वाढल्यामुळे उत्पादनही चांगले झाले; मात्र बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. चांगल्या दराच्या अपेक्षेने केलेली लागवड सध्या तोट्यात जात असल्याचे चित्र आहे.

६ ते ७ रुपये दर; खर्चही निघणे कठीण

सध्याच्या घडीला कांद्याला केवळ ६ ते ७ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. खत, बियाणे, मजुरी, सिंचन अशा सर्व खर्चांचा विचार करता हा दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे.

बाजारात उठाव नाही; माल शेतातच पडून

दर कमी असतानाच बाजारात मागणीही नसल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

शेतात काढलेला कांदा तसाच पडून आहे

व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नाहीत

सौदा झाल्यानंतरही ७-८ दिवस माल उचलला जात नाही

यामुळे कांद्याची गुणवत्ता खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची व्यथा

कांदा काढून शेतातच ठेवला आहे; पण व्यापारी येत नाहीत. सौदा झाला तरी माल वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे नुकसान वाढत आहे.- संतोष चांदणे, शेतकरी, घारोडा

पिकांच्या निवडीत कांद्याला तिसरे स्थान

रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू आणि हरभऱ्यानंतर कांद्याला पसंती दिली.

हरभरा : १५,५०१ हेक्टर

गहू : १०,८१८ हेक्टर

कांदा : ५,२५९ हेक्टर

कांद्याला चांगला दर मिळेल, या अपेक्षेने अनेकांनी लागवड वाढवली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत अपेक्षाभंग झाला आहे.

वाढता खर्च, कमी दर; शेतकरी अडचणीत

उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव अत्यल्प मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

सततच्या दरघसरणीमुळे नाराजी वाढली असून, शासनाने दरवाढीसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

कांद्याच्या दरात लवकरच सुधारणा झाली नाही, तर शेतकऱ्यांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बाजारातील मागणी वाढवणे, निर्यात धोरणात सवलत देणे आणि शेतकऱ्यांना हमीभावासारखा आधार देणे, या उपाययोजना आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन दरात जबरदस्त उसळी; शेतकऱ्यांना मोठा धक्का की दिलासा?

अधिक वाचा : Shenkhat Price : शेतीत बदलता ट्रेंड; शेणखताचे दर ऐकून थक्क व्हाल!

Web Title : प्याज बाजार में गिरावट: कीमतें गिरने से किसानों को नुकसान।

Web Summary : खामगाँव के किसान संकट में हैं क्योंकि प्याज की कीमतें ₹6-7/kg तक गिर गई हैं। उच्च उत्पादन, कम मांग के कारण किसानों को लागत वसूलने में मुश्किल हो रही है। बाजार में अधिक आपूर्ति और देरी से उठान स्थिति को और खराब कर रहे हैं, जिससे भारी नुकसान हो रहा है।

Web Title : Onion Market Plunge: Farmers face losses as prices crash.

Web Summary : Khamgaon farmers face crisis as onion prices plummet to ₹6-7/kg. High production, low demand leave farmers struggling to recover costs. Market glut and delayed pickups worsen the situation, causing significant losses.