Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > शेतातील सोलर पॅनलची सफाई करताना 'या' गोष्टी चुकूनही करू नका, वाचा सविस्तर 

शेतातील सोलर पॅनलची सफाई करताना 'या' गोष्टी चुकूनही करू नका, वाचा सविस्तर 

Latest News Don't do these things while cleaning solar panels in farm, read in detail | शेतातील सोलर पॅनलची सफाई करताना 'या' गोष्टी चुकूनही करू नका, वाचा सविस्तर 

शेतातील सोलर पॅनलची सफाई करताना 'या' गोष्टी चुकूनही करू नका, वाचा सविस्तर 

Solar Panel Care : अनेकदा धुळीने सोलर काचा खराब होत असतात, अशावेळी साफसफाई करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

Solar Panel Care : अनेकदा धुळीने सोलर काचा खराब होत असतात, अशावेळी साफसफाई करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

 Solar Panel Care :    कृषी विभागाच्या माध्यमातून मागेल त्याला सोलर ही योजना राबवली जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात सोलर प्लांट बसवला आहे. 

ही सोलर प्लांटची हाताळणी करताना अनेकदा काळजी घ्यावी लागते. अनेकदा धुळीने सोलर काचा खराब होत असतात, अशावेळी साफसफाई करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण एक चूक महागात पडू शकते. त्यामुळे सर्व सोलर धारकांनी सतर्क व सजग राहणे आवशयक आहे.

काय काळजी घ्यावी, हे पाहुयात... 

  • सोलर पॅनेलमध्ये वीज (DC करंट) सतत तयार होत असते. 
  • दिवसा सूर्यप्रकाशात ती पूर्णपणे Active असते…
  • जर हात ओले असतील, कपडे ओले असतील किंवा वायरिंगमध्ये काहीतरी गडबड असेल. 
  • तर लगेचच शॉक लागतो… आणि तो शॉक खूप जास्त धोकादायक असतो. 
  • डीसी करंटमध्ये हात पकडला गेला तर तो सुटत नाही. 
  • म्हणूनच सोलर प्लेट सफाई करताना हे लक्षात ठेवा!
  • सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच साफ करा. 
  • सोलर डिस्कनेक्ट स्विच बंद करूनच सफाई करा. 
  • ओले कपडे, ओले हात वापरू नका. 
  • लोखंडी ब्रश किंवा हाताने थेट पॅनेलला स्पर्श करू नका. 
  • रबरचे ग्लोव्हज वापरा. 
  • मुलांना सोलर सिस्टिमपासून दूर ठेवा. 
  • दर सहा महिन्यांनी वायरिंग आणि कनेक्शन तज्ज्ञांकडून तपासून घ्या!

 

लक्षात ठेवा – सोलर वापरणं फायद्याचं आहे, पण योग्य काळजी घेतली तरच! जरा चुकीनं हाताळलं, की जीव धोक्यात येतो. त्यामुळे सर्व शेतकरी व सोलर वापरणाऱ्यांना हे महत्वाच आवाहन आहे. 

Web Title : खेतों में सोलर पैनल साफ़ करते समय ये गलतियाँ न करें।

Web Summary : सोलर पैनल साफ़ करते समय सावधानी ज़रूरी है। डीसी करंट से झटके का खतरा होता है; बिजली बंद करें, दस्ताने पहनें और गीली स्थिति से बचें। सुरक्षा के लिए नियमित जाँच ज़रूरी है।

Web Title : Avoid these mistakes while cleaning solar panels on farms.

Web Summary : Cleaning solar panels requires caution. DC current poses shock risks; disconnect power, use gloves, and avoid wet conditions. Regular expert checks are crucial for safety.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.