Lokmat Agro >शेतशिवार > अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी

अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी

Hey... Sarpanch Saheb, don't forget; 'these' are your job responsibilities. | अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी

अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी

Gram panchayat Sarpanch Job Responsibilities : गावाचा विकास प्रमुख म्हणून असलेले प्रथम नागरिक तथा सरपंच यांच्या नक्की जबाबदाऱ्या काय आहेत? हे अनेकांना माहितीच नसते. याच अनुषंगाने आज जाणून घेऊया सरपंच यांच्या जबाबदारीत नक्की काय काय कामे येतात याची परिपूर्ण माहिती. 

Gram panchayat Sarpanch Job Responsibilities : गावाचा विकास प्रमुख म्हणून असलेले प्रथम नागरिक तथा सरपंच यांच्या नक्की जबाबदाऱ्या काय आहेत? हे अनेकांना माहितीच नसते. याच अनुषंगाने आज जाणून घेऊया सरपंच यांच्या जबाबदारीत नक्की काय काय कामे येतात याची परिपूर्ण माहिती. 

शेअर :

Join us
Join usNext

गाव म्हंटले की प्रथमदर्शनी लक्षात येते ग्राम पंचायत. या ग्रामपंचायतीचा कारभार नक्की कसा चालतो. सरपंच, उपसरपंच, सदस्य नक्की काय करतात. याविषयी अनेकदा संभ्रम असतात. 

तर गावाचा विकास प्रमुख म्हणून असलेले प्रथम नागरिक तथा सरपंच यांच्या नक्की जबाबदाऱ्या काय आहेत? हे अनेकांना माहितीच नसते. याच अनुषंगाने आज जाणून घेऊया सरपंच यांच्या जबाबदारीत नक्की काय काय कामे येतात याची परिपूर्ण माहिती. 

१) ग्रामपंचायत व्यवस्थापन व विकास आधी करता यावा म्हणून ग्रामपंचायत निधीचे संवर्धन करण्याची जबाबदारी सरपंचांची आहे.

२) निधीचा दुरूपयोग होणार नाही किंबहुना अपव्यय होणार नाही यासाठी लक्ष देण्याची जबाबदारी देखील सरपंचावर असते. 

३) पंचायतींच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरपंचावर दिलेली असते. 

४) पंचायतीकडे असणाऱ्या सर्व निधीतून होणाऱ्या आर्थिक व्यवहारासाठी सचिव व सरपंच हे संयुक्तपणे जबाबदार असतात. 

५) ग्रामपंचायतीच्या सर्व लेखे योग्य रीतीने तयार करून घेऊन ते ग्रामपंचायतला सादर करण्याची जबाबदारी सरपंच यांची असते. 

६) सर्व कर व फी अकारणी नियमानुसार योग्य दराने करण्यात आली आहे व कोणतीही आर्थिक हानी झालेली नाही या सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी सरपंचाची असते. 

७) ग्रामपंचायतच्या सर्व मालमत्तेची नोंद वहीमध्ये नोंद ठेवून तिचे योग्य रित्या संरक्षण व परिक्षण करण्याची जबाबदारी सरपंचाची राहील.

८) ग्रामनिधीचा कोषाध्यक्ष या नात्याने निधीतून होणारा प्रत्येक खर्च रास्त, वाजवी व अत्यावश्यक असेल तेव्हाच केला जाईल हे पाहण्याची जबाबदारी सरपंचाची असते. 

९) सरपंच पंचायतीच्या बाबतीत खरेदीबाबत नियोजन करणे व पंचायतीचे हित साधले जाईल हे पाहण्याची जबाबदारी देखील सरपंचांची असते. 

१०) पंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या सर्व कामाला, प्रत्यक्ष ठिकाणाला वेळोवेळी भेटी देऊन कामाच्या प्रगतीवर व दर्जावर लक्ष ठेवण्याची जबबादारी सरपंचांची असते. 

११) केंद्र व राज्य शासनाकडून सोपविलेल्या सर्व योजनांची त्यांच्या उद्दिष्टणप्रमाणे अंमलबजावणी होत आहे की नाही ? हे पाहण्याची जबाबदारी देखील सरपंचावर असते. 

१२) विशिष्ट योजनेवर देण्यात आलेले अनुदान निधी त्याच योजनेवर खर्च होतो किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी देखील सरपंचावर असते. 

१३) गावाचा सर्वांगीण विकास करण्याची व शाश्वत विकास कामे करण्याची जबाबदारी देखील सरपंचावर असते. 

१४) वेळोवेळी ग्रामसभा घेण्याची जबाबदारी देखील सरपंचावर असते. 

१५) गाव सलोखा राखण्याचे काम देखील सरपंचाचे असते.

हेही वाचा : Success Story : शेतीपूरक जोडधंदाची धरली वाट; भारत पाटलांची संकटांवर मात

Web Title: Hey... Sarpanch Saheb, don't forget; 'these' are your job responsibilities.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.