Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Dam Water Storage: राज्यात सरासरी 'इतका' जिवंत पाणीसाठा, कोणत्या विभागात किती पाणी शिल्लक?

Dam Water Storage: राज्यात सरासरी 'इतका' जिवंत पाणीसाठा, कोणत्या विभागात किती पाणी शिल्लक?

Dam Water Storage: Average 'so much' living water storage in the state, how much water is left in which section? | Dam Water Storage: राज्यात सरासरी 'इतका' जिवंत पाणीसाठा, कोणत्या विभागात किती पाणी शिल्लक?

Dam Water Storage: राज्यात सरासरी 'इतका' जिवंत पाणीसाठा, कोणत्या विभागात किती पाणी शिल्लक?

राज्यातील लघू, मध्यम व मोठ्या २९९४ धरणांमध्ये आता एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

राज्यातील लघू, मध्यम व मोठ्या २९९४ धरणांमध्ये आता एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्ण झळांचा इशारा देण्यात आला असताना धरणसाठा वेगाने खालावत असल्याचे जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीतून समोर येते.

राज्यात सध्या सरासरी २५.०९ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला असून पाणीटंचाईच्या तीव्र झळा नागरिकांना बसत आहेत. दरम्यान राज्यातील लघू, मध्यम व मोठ्या २९९४ धरणांमध्ये आता १० हजार १५६ दलघमी म्हणजेच ३५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

मराठवाड्यात राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा राहिला असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. मराठवाड्यात सरासरी उपयुक्त पाणीसाठा आता १०.३५ टक्के एवढाच उरला आहे. तर पुण्यातील ९२० लहान मध्यम मोठ्या धरणांमध्ये १९. ६८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्याखालोखाल नाशिक विभागात २७.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कोकण विभागात ३८.६७ टक्के पाणीसाठा राहिला असून नागपूर व अमरावती विभागात ३९ आणि ४० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

मराठवाड्यात ३१.७३ टक्क्यांची जलतूट

मराठवाड्यात मागील वर्षी याच दिवशी ४२.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यंदा सरासरी पाणीसाठा १०.३५ टक्क्यांवर पाेहोचला असून ३१.७३ टक्क्यांची जलतूट दिसून येत आहे.

जाणून घ्या तुमच्या विभागात काय आहे धरणसाठा..

Web Title: Dam Water Storage: Average 'so much' living water storage in the state, how much water is left in which section?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.