राज्यात विदर्भातील तापमान प्रचंड वाढत असून आज हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंशांच्या वर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. धडकी भरवणाऱ्या तापमानामुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे.
दरम्यान, नागपूर विभागातील धरणांमध्ये आज दि १८ एप्रिल रोजी ४३.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, २००२ दलघमी पाणीसाठा सध्या नागपूर विभागात शिल्लक आहे. गतवर्षीच्या तूलनेत हा पाणीसाठा अधिक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकृत माहितीवरून स्पष्ट हेात आहे. नागपूर प्रदेशातील एकूण १६ धरणांमध्ये मागील वर्षी २०.५३ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ४४.१७ टक्के आहे.
नागपूर विभागातील ३२५ लघू, ४२ मध्यम व ३२५ मोठ्या धरणांमध्ये सध्या ४३ टक्के पाणी उरले आहे. नागपूरच्या तोतलाडोह धरणात आज ५८.१८ टक्के पाणीसाठा आहे. तर कामठी खैरी धरणात ६२.१० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नांद धरणात १०.०६ टक्के पाणी शिल्लक आहे.
वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंदपूर, भंडारा जिल्ह्यातील धरणांमध्ये किती पाणी शिल्लक? जाणून घ्या..
भंडारा             टक्के       गतवर्षी
बावनथडी       २५.४९        ३८.४६
गोसीखुर्द         ३७.९९         २३.६९
चंद्रपूर
असोलामेंढा     २९.९८       ८२.६
गडचिरोली
दिना               १९.८४        ३५.१५
गोंदिया
धापेवाडा         ७५.८५      38.88 %
इटियाडोह      ३५.८५        32.36 %
कालीसरार      ०                 84.09 %
पुजारीटोला     ८७.७८        71.02 %
सिरपूर            १२.२९        19.54 %
वर्धा
बोर                ३४.९२         0.00 %
निम्न वर्धा        ५३.२५         54.65 %
