lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > खडकाळ माळरानावर दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन

खडकाळ माळरानावर दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन

A ample production of strawberries in ten guntha barren land | खडकाळ माळरानावर दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन

खडकाळ माळरानावर दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन

राहू येथील वांधारा परीसरात सुभाष शिंदे यांची चार-पाच एकर माळरानावरील शेती असून तेथील काही शेती त्यांनी बागायती केली आहे. खडकाळ माळरान शेती विकसित केल्यानंतर दोन-तीन वेळा उभी-आडवी नांगरट करण्यात आली.

राहू येथील वांधारा परीसरात सुभाष शिंदे यांची चार-पाच एकर माळरानावरील शेती असून तेथील काही शेती त्यांनी बागायती केली आहे. खडकाळ माळरान शेती विकसित केल्यानंतर दोन-तीन वेळा उभी-आडवी नांगरट करण्यात आली.

शेअर :

Join us
Join usNext

संदीप नवले
पारंपरिक शेतीमधील अनेक वर्षांपासूनचा गाडा अनुभव तसेच मुलाने कृषी पदविका धारण करुन घेतलेल्या उच्च शिक्षणाच्या अनुभवाने पडीक स्वरुपातील खडकाळ उजाड माळरानावरील शेती विकसित करुन दहा गुंठ्याच्या क्षेत्रात अगदी महाबळेश्वरच्या धरतीवर केलेल्या प्रयोगाला प्रामाणिक कष्टाची जोड देऊन राहू (ता. दौंड) येथील प्रगतशील शेतकरी सुभाष नरहरी शिंदे यांनी स्ट्रॉबेरी पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.

राहू येथील वांधारा परीसरात सुभाष शिंदे यांची चार-पाच एकर माळरानावरील शेती असून तेथील काही शेती त्यांनी बागायती केली आहे. खडकाळ माळरान शेती विकसित केल्यानंतर दोन-तीन वेळा उभी-आडवी नांगरट करण्यात आली. सुरुवातीला जमिनीचा पोत चांगला तयार होण्यासाठी तागाचे पिक घेतले. ताग जमिनीत गाडून टाकल्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन ट्रेलर शेणखत टाकण्यात आले.

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट करुन अडीच फूट रुंदीचा पट्टा काढण्यात आला, मल्चिंग पेपर पट्टधावर पसरवून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्ट्रॉबेरी रोपांची लागवड एक ते दीड फूट अंतरावर करण्यात आली. ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली असून वॉटर सोलेबल खतांचा वापर तसेच पाण्यातून खतांची मात्रा दिल्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली आहे.

साधारणपणे हिवाळ्यातील पीक म्हणून स्ट्रॉबेरी पिकाकडे पाहिले जात असून तीन ते चार महिन्यांचा कालावधी पर्यंत टिकून राहते. सद्यस्थितीत वातावरणात थंडीचा गारवा वाढल्याने उत्पादन देखील वाढत आहे. सरासरी पंधरा ते वीस किलो रोजचे स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळत आहे.

माझ्या शेतीमधील जुन्या अनुभवाला मुलांच्या नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून इतर पारंपरिक पिकांपेक्षा थोडासा वेगळा प्रयोग शेतीमध्ये करण्याचे उरल्यानंतर माळरानावरील शेतीमध्ये स्ट्रॉबेरीचे नगदी पीक घेतले असून समाधानकारक उत्पादन मिळत आहे. - सुभाष नरहरी शिंदे, शेतकरी

अधिक वाचा: खारतोडे बंधूच्या आंबट, गोड चवीच्या चेकनेट बोरांनी केलं ग्राहकांना चेकमेट

Web Title: A ample production of strawberries in ten guntha barren land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.