Join us

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार न्याय? शेतकरी संघटनेतर्फे श्रीरामपूरात आज आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 09:50 IST

संपकरीची हमाली, मापाई देण्याची मागणी पूर्णतः बेकायदेशीर आहे कारण शेतकरी मोकळा कांदा विक्रीसाठी आणताना डम्पिंग ट्रॉली मध्ये घेऊन येतो त्याचे वजन प्लेट काट्यावर करून काटा पावतीचे पैसे शेतकरीच देतात.

श्रीरामपूर पंचक्रोशीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समितीत करण्यात आलेली कांदा कोंडी फोडण्यासाठी आज मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सहायक निबंधक कार्यालय श्रीरामपूर येथे आंदोलन होणार आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिनांक ७ ऑगस्ट पासून मोकळा कांदा बाजार बेमुदत बंद करण्यात आला आहे.

संपकरीची हमाली, मापाई देण्याची मागणी पूर्णतः बेकायदेशीर आहे कारण शेतकरी मोकळा कांदा विक्रीसाठी आणताना डम्पिंग ट्रॉली मध्ये घेऊन येतो त्याचे वजन प्लेट काट्यावर करून काटा पावतीचे पैसे शेतकरीच देतात.

कांदा लिलाव सुरू असताना खाली ओतला जाणारा कांदा पुन्हा ट्रॉलीत भरण्याचे पैसे पणं शेतकरीच देतात, लिलाव झाल्यावर कांदा खाली करताना डम्पिंग ट्रॉलीमुळे एक खटक्यावर ट्रॉलीतील कांदा खाली होतो तिथं कांद्याच्या एकही चिंगळी सुद्धा हामालांचा हात लागत नाही.

त्यामुळे मोकळा कांदा हमाली देण्याचा प्रश्नच येत नाही कारण NO WORK NO WAGES, नो वर्क नो वेजेस, काम नाही तर पैसा पण नाही या कायद्याप्रमाणे शेतकरी कोणतीही हमाली, मापाई देणार नाहीत.

७ ऑगस्ट पासून श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा बाजार बंद करून बाजार समितीच्या सभापती, संचालक, सचिव, व प्रशासन यांनी श्रीरामपूर पंचक्रोशीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा कोंडी करून शेतकऱ्यांना कांदा गोणीत विक्रीसाठी आणण्यास मजबूर केले आहे.

कांदा गोणी मध्ये विक्रीस आणण्याचा खर्च ३०० ते ४०० रु. प्रती क्विंटल आहे तर त्या तुलनेत मोकळा कांदा विक्रीसाठी फक्त ८० ते ९० प्रती क्विंटल खर्च येतो.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोकळा कांदा विक्रीसाठी आणणे परवडते आहे पणं संप घडवून आणल्यामुळे मोकळा कांदा लिलाव बंद करण्यात आले आहेत.

बंद करण्यात आलेला मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी श्रीरामपूर पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना निलेश शेडगे, शेतकरी संघटनास्वतंत्र भारत पक्ष यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आपण आज २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता (AR ऑफिस) सहायक निबंधक कार्यालय, गुलमोहोर हॉटेल समोर संगमनेर रोड, श्रीरामपूर येथे उपस्थित राहावे.

आपल्या कांद्याची करण्यात आलेली कांदा कोंडी फोडण्यासाठी अवश्य यावेच लागेल. आता नाही तर कधीच नाही कारण बाजार समितीत मोकळा कांदा बाजार कायमचा बंद करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे.

अधिक वाचा: बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; गणेशोत्सवात राज्यात 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीश्रीरामपूरशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डकुलसचिवसंप