बारामती : शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारभावातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि.१ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हमीभावाने शेतमाल विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, हा किमान आधारभूत किंमत योजनेचा मुख्य उद्देश आहे.
बारामती बाजार आवारात लिलावात सर्वसाधारण दर्जा असलेल्या हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी निघत असल्याने शासनाकडे मागणी केली होती.
त्यानुसार हरभरा (चना) खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे मार्केटिंग फेडरेशन, पुणे यांनी कळविल्यानुसार ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे.
त्यामुळे हरभरा ऑनलाइन नोंदणी नीरा कॅनॉल संघ, बारामती येथे मुदतीत करून खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे सभापती विनायक गावडे व उपसभापती अरुण सकट यांनी केले आहे.
बारामती तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी रबी हंगाम २०२६ मधील हमीभावाने हरभरा खरेदीची ऑनलाइन नोंदणी १ मार्चपासून सुरू झाली असल्याची माहिती बाबालाल काकडे नीरा कॅनॉल संघाचे चेअरमन सतीश काकडे यांनी दिली.
सध्या बाजार आवारात हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल सरासरी रु. ४,९०० तर कमाल रु. ५,१०० असे निघत आहेत.
हरभरा हमीदर ५,८७५ रुपये◼️ केंद्र शासनाने हरभऱ्याचा हमीदर रु. ५,८७५ असा निश्चित केला आहे.◼️ रजिस्ट्रेशन झालेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात येणार आहे.◼️ वाळलेला व स्वच्छ असलेला हरभरा प्रतिएकर २.५० क्विंटलप्रमाणे एफएक्यू दर्जाचा खरेदी करण्यात येणार आहे.◼️ त्यासाठी ७/१२ उतारा, सन २०२५-२६ चा पिकपेरा हरभरा नोंद, आधार कार्ड आणि आयएफएससी कोडसह बँकेची पासबूक झेरॉक्स, मोबाइल नंबर इत्यादी संपूर्ण कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
मेसेज आल्यावर हरभरा विक्रीस आणावा◼️ हरभरा खरेदीची ऑनलाईन नोंदणी १ मार्चपासून सुरू झाली आहे.◼️ ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएसएमद्वारे मेसेज आल्यावर बारामती मुख्य यार्डवरील यांत्रिक चाळणी खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीस आणावा, असे आवाहन माहिती सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.
अधिक वाचा: अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा; थकीत व नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कसा होणार लाभ?
Web Summary : Baramati farmers can now sell chickpeas at the guaranteed rate of ₹5,875/quintal through government centers. Registration started March 1st, 2026 and continues until March 31st, 2026. Farmers need to register online with required documents at Neera Canal Sangh, Baramati.
Web Summary : बारामती के किसान अब सरकारी केंद्रों के माध्यम से 5,875 रुपये/क्विंटल की गारंटीकृत दर पर चना बेच सकते हैं। पंजीकरण 1 मार्च, 2026 से शुरू हुआ और 31 मार्च, 2026 तक जारी रहेगा। किसानों को आवश्यक दस्तावेजों के साथ नीरा कैनाल संघ, बारामती में ऑनलाइन पंजीकरण कराना होगा।