अलिबाग : अलिबागचा गुणकारी पांढरा कांदाबाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला असून यंदा चांगलाच भाव खात आहे. ४०० रुपयांना कांद्याच्या मोळेची विक्री होत आहे.
गेल्या वर्षी ती ३०० रुपये होती. विशेष म्हणजे ग्राहक भाव न करता कांदा खरेदी करीत आहेत. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
त्यामुळे हा कांदा राज्यभर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे रायगडमध्ये येणारे पर्यटक मोकळ्या हाताने परत जात नाहीत. हा गुणकारी औषध कांदा जाताना घेऊन जात आहेत.
अलिबाग-मुरूडमध्ये येणारे पर्यटक परतीच्या प्रवासासाठी अलिबाग-वडखळ मार्गाने मुंबई, पुण्याकडे निघताना सफेद कांद्याची माळ, कलिंगड, वालाच्या शेंगा, ताजी भाजी, औषधी कंदमुळे आवर्जून खरेदी करत आहे.
यात पांढऱ्या कांद्याला विशेष मागणी आहे. कृषी विभागाने पांढरा कांदा लावडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला असून या वर्षी लागवड क्षेत्र वाढले आहे.
३०० रुपये माळ असा दर गेल्यावर्षी यावर्षी होता. दर वाढले आहेत. अलिबागचा पांढरा गुणकारी औषधी कांदा तयार झाला आहे. अलिबाग-वडखळ मार्गावर सध्या हा कांदा विक्रीसाठी उपलब्ध असून त्याला मागणी आहे.
मागील १५ दिवसांपासून आम्ही नफ्यावर शेतात पिकविलेला सेंद्रिय पांढरा कांदा विक्रीसाठी आणत आहे. या कांद्याला चांगली मागणी आहे. ग्राहक भाव न करता कांदा विकत घेत आहे. तसेच वालाच्या शेंगांनाही मागणी आहे. - अनिता नलावडे, शेतकरी
अलिबागला आल्यावर चिंचेच्या गोळ्यापासून कडधान्य, नाचणी, सुकी मासळी घेऊन जाता येते. त्यात सफेद कांदा विशेष आवडीचा झाला आहे. गतवर्षी ३०० रुपये सफेद कांद्याची माळ होती, यंदा ती ४०० रुपयांपर्यंत गेली आहे. - प्रियांका आहिरे, मुंबई
अधिक वाचा: शेतजमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद आता थांबणार; भूमिअभिलेख विभागाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय