Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे गव्हाच्या दरात वाढ; वाचा लोकवन गव्हाला क्विंटलमागे काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:52 IST

gahu market यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका गव्हाला बसला आहे. देशातील गहू उत्पादन क्षेत्रात काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका गव्हाला बसला आहे. देशातील गहू उत्पादन क्षेत्रात काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

पुणे मार्केट यार्डबाजारात चांगल्या दर्जाचा गहू आवक कमी होते आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचे दर तेजीत आहेत. त्याचबरोबर यावर्षी गहू बरोबर ज्वारी उत्पादन ही अत्यंत अल्प प्रमाणात झाले आहे, अशी माहिती अन्नधान्याच्या व्यापाऱ्यांनी दिली.

सध्या मार्केट यार्ड घाऊक बाजारात देशा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात, बिहार, महाराष्ट्र या राज्यांतून आवक सुरू असते.

जागतिक युद्धजन्य परस्थिती व भारतामधील नैसर्गिक आपत्ती या दोन्ही गोष्टींमुळे भारतामध्ये अन्नधान्याची मोठी मागणी वाढली आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे देशातील गहू उत्पादन क्षेत्रात गव्हाचा जोरदार फटका बसला आहे. चांगल्या प्रतीच्या गव्हाचा दर्जा खालावला आहे. परिणामी, बाजारात दर्जेदार गव्हाची आवक मर्यादित राहिली आहे.

या देशांमध्ये होतो निर्यातबांगलादेश, श्रीलंका, युक्रेन, मलेशिया, चीन, नेपाळ, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, येमेन रिपब्लिक, कतार, ओमन आणि पश्चिम आशियातील काही देशांत गहू निर्यात केला जातो. उत्पादन चांगले असले तरी गुणवत्तापूर्ण माल कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

बाजारामधील क्विंटलचे दर यानुसारगव्हाचा प्रकार - सध्याचे दर◼️ मध्य प्रदेश-लोकवन : ३७०० ते ४८००◼️ मध्य प्रदेश-सिहोर : ४८०० ते ६०००◼️ खानदेश-लोकवन : ३००० ते ३५००◼️ गुजरात-लोकवन : ३८०० ते ४२००

अधिक वाचा: पीएम किसानचा २२ वा हप्ता आला मात्र नमो शेतकरीचा ९ वा हप्ता कधी? शेतकऱ्यांना प्रतीक्षा

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rains Increase Wheat Prices; Lokwan Wheat Rate Detailed

Web Summary : Unseasonal rains have severely impacted wheat production, leading to increased prices. High-quality wheat arrivals in Pune market yard are limited. Lokwan wheat rates range from ₹3700 to ₹4800 per quintal, depending on origin. Global demand and natural disasters fuel price rise.
टॅग्स :गहूबाजारमार्केट यार्डपुणेपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपाऊसयुद्ध