धूलिवंदन निमित्ताने राज्यातील अनेक बाजारात लिलाव बंद होते. तथापि, आलेल्या आवकेच्या आधारावर आज शुक्रवार (दि.१४) राज्याच्या पाच बाजार समित्यांमध्ये एकूण १५७ क्विंटल गव्हाची आवक झाली.
यामध्ये ६७ क्विंटल २१८९ व ८ क्विंटल हायब्रिड वाणाचा समावेश होता. आजच्या लिलावामध्ये गहू दर काही अंशी मंदावल्याचे दिसून आले. ज्यास बाजार बंदचा परिणाम म्हणता येईल.
आज गव्हाची सर्वाधिक आवक असलेल्या लासलगाव-निफाड बाजारात २१८९ वाणाच्या गव्हाला कमीत कमी २५९९ तर सरासरी २६५० असा दर मिळाला. तसेच पिंपळगाव(ब)-औरंगपूर भेंडाळी बाजारात आवक झालेल्या हायब्रीड वाणाच्या गव्हाला सरासरी २५०१ दर मिळाला.
यासोबतच आज राहुरी येथे २५५०, राहुरी-वांबोरी येथे २६३३, संगमनेर येथे २६९८ असा सरासरी दर मिळाला.
कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील गहू आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
14/03/2025 | ||||||
राहूरी | --- | क्विंटल | 33 | 2500 | 2600 | 2550 |
राहूरी -वांबोरी | --- | क्विंटल | 34 | 2000 | 2650 | 2633 |
संगमनेर | --- | क्विंटल | 15 | 2595 | 2801 | 2698 |
लासलगाव - निफाड | २१८९ | क्विंटल | 67 | 2599 | 2766 | 2650 |
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी | हायब्रीड | क्विंटल | 8 | 2501 | 2501 | 2501 |