Join us

नऊ हजारांवर गेलेला सोयाबीनचा दर कमी होण्याचं काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 12:10 IST

सोयाबीनचा बाजार मागील दोन वर्षात सुधारला नाही. दोन-दोन वर्षे दर वाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन चार हजार रुपयांपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना विकावे लागले आहे.

सोलापूर : कधी आयातीवर शुल्क वाढते, तर कधी कमी केले जाते. यामुळे सोयाबीनचाबाजार ढासळत असल्याने शेतकऱ्यांना हमीभाव तर सोडा त्याहीपेक्षा कमी दर मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीनचाबाजार मागील दोन वर्षात सुधारला नाही. दोन-दोन वर्षे दर वाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन चार हजार रुपयांपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना विकावे लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यात जो दर मिळतोय तोच दर राज्यातील इतर बाजार समित्यांत मिळतोय. नऊ हजारांवर गेलेला दर पाच हजारांनी कमी होण्याचे कारण आयातीचे धोरण असल्याचे सांगतात.

सोयाबीन तेलाचा बाजारात दर वाढू नये, याची काळजी केंद्र सरकार घेत आहे. त्यामुळे आयात शुल्क कमी करून कच्चे तेल आयात केले जाते. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अपेक्षित किंवा हमी भावही मिळत नाही.

यंदा जिल्ह्यात १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे. मात्र, यंदा सोयाबीनचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येईल, असे सांगण्यात येत आहे.

याशिवाय उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात सतत पाऊस पडत असल्याचा फटका सोयाबीनला बसला आहे.

बाजारात सोयाबीनला म्हणावी तितकी मागणी नसल्याने दरात वाढ होत नाही. मागणी वाढली तरच दरात वाढ होणार आहे. मागील महिन्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे सोयाबीन खराब झाले आहे.

अशा स्थितीत सोयाबीनला अपेक्षित दरही मिळणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. हमीभावाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सोयाबीन उत्पादकांमध्ये नाराजी राहणार आहे.

मागील दोन वर्षांत सोयाबीनचा दर वाढत नसल्याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला आहे. याशिवाय पेरणी भरपूर क्षेत्रावर होते. मात्र, नंतर धो-धो पडणाऱ्या पावसाने उत्पादन कमी येते. शेतकऱ्यांना केलेल्या खर्चाइतकेही पैसे मिळत नाहीत. - मनोज साठे, वडाळा

अधिक वाचा: Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीपीकपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरपाऊस