Join us
Daily Top 2Weekly Top 5

उंबरखेडच्या कलिंगडाला मिळातोय उच्चांकी दर; यंदा चांगल्या नफ्याची शेतकऱ्यांना आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:11 IST

Watermelon Market : उंबरखेड (ता. चाळीसगाव) मध्ये कलिंगड लागवडीला यंदा चांगला प्रतिसाद मिळत असून भावही २१ रूपये प्रतिकिलो असा उच्चांकी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जळगाव जिल्ह्याच्या उंबरखेड (ता. चाळीसगाव) मध्ये कलिंगड लागवडीला यंदा चांगला प्रतिसाद मिळत असून भावही २१ रूपये प्रतिकिलो असा उच्चांकी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

परिसरात यंदा अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली आहे. शेतकरी गोरख धर्मा पाटील यांना यंदा प्रतिकिलो २१ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे. सुरुवातीलाच चांगला भाव मिळाल्याने कलिंगड शेतीतून चांगल्या नफ्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

दरवर्षी केवळ ५ ते ११ रुपयांचा मिळतो भाव

दरवर्षी ५ ते ११ रुपये दरम्यान भाव मिळणाऱ्या कलिंगडाला यंदा विक्रमी दर मिळाला आहे. आधार (ता. मालेगाव) येथील व्यापारी यांच्यासह खान्देशातील अन्य व्यापाऱ्यांकडूनही आगाऊ माल खरेदी केली जात आहे. एकरी २५ ते ३० टनांपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता गोरख पाटील यांनी व्यक्त केली आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती फायदेशीर ठरते, असा अनुभव गोरख पाटील सांगतात.

योग्य नियोजन केल्यास कलिंगड लागवड फायदेशीर

•ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर, योग्य वेळी कीटकनाशक फवारणी आणि पाण्याचे नियोजन यामुळे उत्पादनखर्च कमी होऊन जास्त उत्पन्न मिळवता येते.

• व्यापारी साधारणतः चार किलोंपेक्षा जास्त वजनाची फळे खरेदी करतात. उर्वरित २५ ते ३० टक्के फळांनाही योग्य खत व्यवस्थापनामुळे बाजारात चांगला दर मिळवता येतो, असे ते सांगतात.

• मात्र गेल्या पंधरा वर्षापासून कलिंगड लागवड करताना योग्य नियोजनामुळे कधीही नुकसान झालेले नाही, असा त्यांचा दावा आहे. दरवर्षी किमान एक लाख रुपयांपर्यंत नफा मिळाल्याचे ते सांगतात.

हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

English
हिंदी सारांश
Web Title : Umberkhed Watermelon Farmers Reap High Prices, Hope for Profits

Web Summary : Umberkhed farmers are experiencing high demand and record prices for watermelon crops, reaching ₹21 per kg. With modern techniques, farmers expect good profits this season, exceeding previous years' earnings. Proper planning is key.
टॅग्स :बाजारफळेजळगावशेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्ड