Join us

बाजारात कलिंगड अन् खरबूजची आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:52 IST

Fruits Market Rate Update : थंडीचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणही आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे आता भाजीपाला आणि फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. परिणामी बाजारात उत्तम दर्जाचा भाजीपाला आणि फळे दिसू लागली आहेत.

थंडीचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणही आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे आता भाजीपाला आणि फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. परिणामी बाजारात उत्तम दर्जाचा भाजीपाला आणि फळे दिसू लागली आहेत.

फळबाजार विविध प्रकारच्या फळांनी सजले आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच बाजारात लाल रंगाच्या रसरशीत कलिंगड, खरबूज त्याचबरोबर पपई, द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात सर्व प्रकारची देशी फळे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

बाजारात शहरातील बाजारपेठेत कलिंगडाचा हंगाम सुरू झाला आहे. कलिंगडचा हंगाम जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर, माढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर येथे पुणे जिल्ह्यात कलिंगडची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे सध्या जिल्ह्यातून कलिंगडाची आवक होत आहे.

तीन दिवसांत २२६ क्विंटलची आवक

दि. ८ जानेवारी १०० क्विंटल, दि. ७ जानेवारी ४५ क्विंटल, तर दि. ६ जानेवारी ८१ क्विंटल कलिंगडाची आवकची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली होती. तर त्याला कमीत कमी दर ३०० तर जास्तीत जास्त १००० रुपये दर मिळाला, तर खरबूज याच तीन दिवसांमध्ये ६४ क्विंटल अवाक झाली त्यास कमीत कमी दर ५००, तर जास्तीत जास्त १००० रुपये दर मिळाला.

हेही वाचा : भारतातून कोणकोणत्या कृषी मालांची कुठे होतेय निर्यात? वाचा सविस्तर माहिती

टॅग्स :फळेभाज्याबाजारशेतकरीशेतीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती