गोपाल लाजूरकर
गडचिरोली जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारा 'हिरवा सोन्या'चा अर्थात तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळ आला आहे. यंदा तेंदूपाने प्रतिगोणी ५ हजार रुपयांचा दर आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत ७५० रुपयांनी वृद्धी झालेली आहे. १०८७ ग्रामसभांनी तेंदूपाने संकलनाबाबतचे ठराव घेऊन तयारी पूर्ण केली असली, तरी लिलाव प्रक्रियेला अद्याप गती मिळालेली नाही.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून संकलन सुरू होत असताना, अनेक ग्रामपंचायतींनी अद्याप लिलावाच्या जाहिरातीच प्रसिद्ध न केल्याने मजुरांमध्ये चिंता आहे.
१४८७ गावे 'पेसा' क्षेत्रात समाविष्ट आहेत. यामध्ये १२४० जुनी तर नव्याने समाविष्ट झालेल्या २४२ गावांचा समावेश आहे. नॉन पेसा गावांमध्येही संकलन केले जाते.
३९५ ग्रामसभांनी पर्याय निवडलाच नाही
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ग्रामसभांपैकी ३९५ ग्रामसभांनी तेंदूपाने संकलनासाठी कोणताही पर्याय निवडलेला नव्हता. यामध्ये सर्वाधिक १३४ ग्रामसभा एटापल्ली तालुक्यातील आहेत, तर कुरखेडा (७६) आणि भामरागड (६८) तालुक्यांचा क्रमांक लागतो. अहेरी आणि मुलचेरा तालुक्यातील प्रत्येकी फक्त २ ग्रामसभांनी पर्याय निवडलेला नाही.
पाच वर्षांत वृद्धी झालेले प्रतिगोणी दर (रुपयांत)
| वर्ष | शासकीय क्षेत्र | खाजगी क्षेत्र |
| २०२२ | ३४०० | ३४५० |
| २०२३ | ३६५० | ३७०० |
| २०२४ | ३९०० | ३९५० |
| २०२५ | ४२५० | ४३०० |
| २०२६ | ५००० | ५०५० |
तेंदूपाने संकलन ग्रामसभा
| तालुका | पेसा ग्रा. पं. | ग्रामसभा |
| अहेरी | ३९ | ११ |
| आरमोरी | २० | १७७ |
| भामरागड | १९ | ४० |
| चामोर्शी | ३९ | ४९ |
| एटापल्ली | ३१ | १४५ |
| गडचिरोली | २६ | ४३ |
| धानोरा | ६१ | २२३ |
| देसाईगंज | ०९ | ०५ |
| कुरखेडा | ४५ | ८१ |
| कोरची | २९ | १३९ |
| मुलचेरा | ११ | ४३ |
| सिरोंचा | ३९ | ७४ |
| एकूण | ३६८ | १०८७ |
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Tendu leaf prices rise in Gadchiroli, boosting the rural economy. Despite increased rates and village resolutions, auction delays worry laborers as advertisement delays persist. Collection from May second week faces uncertainty.
Web Summary : गढ़चिरौली में तेंदू पत्ते की कीमतें बढ़ीं, जिससे ग्रामीण अर्थव्यवस्था को बढ़ावा मिला। बढ़ी हुई दरों और ग्राम प्रस्तावों के बावजूद, विज्ञापन में देरी के कारण नीलामी में देरी से मजदूर चिंतित हैं। मई के दूसरे सप्ताह से संग्रह अनिश्चित है।