मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत पापडी आणि वालवडच्या बाजारभावात वाढ झाली असून, वाटाणा, गवार आणि मिरची यांचे भावही तेजीत आहेत.
रविवारी बाजार समितीत एकूण १२,५६४ डाग इतकी तरकारी शेतमालाची आवक झाली. यामुळे बाजारभावात वाढ झाल्याची माहिती सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी दिली.
पापडी आणि वालवड या शेतमालाला १० किलोसाठी ६८० ते ७४० रुपये असा चांगला बाजारभाव मिळाला. आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर आणि शिरूर या भागांतून शेतकरी मोठ्या प्रमाणावर तरकारी विक्रीसाठी मंचर बाजार समितीत येत आहेत.
उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले की, तरकारी शेतमालाची वाढती आवक आणि मागणीमुळे बाजारभावात सुधारणा झाली आहे.
शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून, मंचर बाजार समिती शेतमाल विक्रीसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. आजूबाजूच्या तालुक्यातून तसेच इतर जिल्ह्यातूनही या ठिकाणी शेतकरी माल विक्रीस आणत आहेत.
तरकारी शेतमालाचे भावकारले (२९८) : २९५-५७० रुपयेगवार (३२०) : ३७५-७०० रुपयेघेवडा (९७) : १२०-४०० रुपयेचवळी (१७९) : २४०-४५० रुपयेढोबळी मिरची (१५९) : २१५-४०० रुपयेभेंडी (१८९) : २१०-३७० रुपयेफरशी (३१७) : ३७५-७०० रुपयेफ्लॉवर (३,००४) : १००-२१० रुपयेभुईमूग शेंगा (४) : ५५० रुपयेदोडका (४४) : २३५-४०१ रुपयेमिरची (५५०) : ३२६-६०० रुपयेतोंडली (३५) : २४५-४११ रुपयेलिंबू (८) : ५०० रुपयेकाकडी (७१५) : २५-१८० रुपयेकोबी (२,५५५) : १०-२० रुपयेवांगी (६५) : १७५-३१० रुपयेदुधी भोपळा (७४) : १४०-२६० रुपयेबीट (२,६१९) : १००-२२१ रुपयेआले (४४) : १५०-३२५ रुपये
अधिक वाचा: बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; गणेशोत्सवात राज्यात 'या' ठिकाणी जोरदार पाऊस