Join us

कर्नाटकातून पांढऱ्या कांद्याच्या बाराशे पिशव्यांची सोलापूर बाजारात आवक; वाचा कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:05 IST

kanda market solapur येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १५९ कांदा गाड्यांची आवक झाली. सध्या बाजार समितीमध्ये येत असलेला पांढरा कांदा हा कर्नाटक राज्यातून येत आहे.

सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १५९ कांदा गाड्यांची आवक झाली. सध्या बाजार समितीमध्ये येत असलेला पांढरा कांदा हा कर्नाटक राज्यातून येत आहे.

लाल कांदा अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातून येत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. दरम्यान, गुरुवारी पहाटेच्या सुमारास कांदा लिलाव सुरू झाला.

चांगल्या कांद्याला किमान १००, तर कमाल भाव दोन हजार रुपये आला आहे. सर्वसाधारण दर ९५० एवढा राहिला आहे. गुरुवारी ३० हजार ६६२ कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली.

१५ हजार ३३१ क्विंटल कांद्यातून बाजार समितीमध्ये १ कोटी ४५ लाख ६४ हजार ४५० रुपयांची उलाढाल झाली आहे.

पांढरा कांद्याच्या १ हजार २०२ पिशव्या बाजारात आल्या असून, किमान दर २००, कमाल दर ३०००, तर सर्वसाधारण दर १४५० रुपये एवढा राहिला आहे.

६०१ क्विंटल पांढऱ्या कांद्यातून ८ लाख ७१ हजार ४५० रुपयांची उलाढाल झाली आहे. सोमवार, मंगळवारी अचानक आवक वाढली होती.

बुधवारी व गुरुवारी आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेजारील जिल्ह्यातूनही कांदा विक्रीसाठी सोलापुरात येत आहे.

अधिक वाचा: E Pik Pahani: राज्यात ई-पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ; आता शेतकरी किती तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी?

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Market Sees 1200 White Onion Bags from Karnataka

Web Summary : Solapur market received 159 onion vehicles, mainly white onions from Karnataka. Good quality onions fetched ₹2000, with an average of ₹950. Over 30,000 bags were traded, resulting in ₹1.45 crore turnover. White onion prices ranged from ₹200-₹3000.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरकर्नाटकअहिल्यानगरपुणे