Lokmat Agro >बाजारहाट > Tur Kharedi : ना छत, ना मोजणी… नाफेड केंद्रात शेतकऱ्यांची फरपट! वाचा सविस्तर

Tur Kharedi : ना छत, ना मोजणी… नाफेड केंद्रात शेतकऱ्यांची फरपट! वाचा सविस्तर

Tur Kharedi: No roof, no counting… Farmers' plight at Nafed center! Read in detail | Tur Kharedi : ना छत, ना मोजणी… नाफेड केंद्रात शेतकऱ्यांची फरपट! वाचा सविस्तर

Tur Kharedi : ना छत, ना मोजणी… नाफेड केंद्रात शेतकऱ्यांची फरपट! वाचा सविस्तर

Tur Kharedi : मान्सूनपूर्व पावसामुळे नाफेड खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना मोजणी न झाल्याने रात्रभर जागून काढावी लागली. वाचा सविस्तर (Tur Kharedi)

Tur Kharedi : मान्सूनपूर्व पावसामुळे नाफेड खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना मोजणी न झाल्याने रात्रभर जागून काढावी लागली. वाचा सविस्तर (Tur Kharedi)

शेअर :

Join us
Join usNext

Tur Kharedi : शेलूबाजार परिसरात मंगळवारी (२७ मे) सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने शेतकरी आणि व्यापारी दोघांचीही मोठी धावपळ उडवली. (Tur Kharedi)

नाफेड खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना मोजणी न झाल्याने रात्रभर जागून काढावी लागली, तर दुसरीकडे बाजारातील अनेक दुकानदारांच्या दुकानांत पाणी घुसल्याने आर्थिक नुकसान झाले. (Tur Kharedi)

नाफेड खरेदी केंद्रावर अडचणींचा डोंगर

शेलूबाजार येथील नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी आलेले शेतकरी पावसामुळे हैराण झाले. ८ ते १० शेतकऱ्यांची तूर मोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच पाऊस सुरू झाल्याने, शेतकऱ्यांनी शेतमाल जागेवरच ठेवावा लागला. काहींनी तूर ताडपत्रीखाली झाकून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, तर काहींना ती उघड्यावरच ठेवावी लागली.  (Tur Kharedi)

रात्रभर मोजणी न झाल्यामुळे शेतकरी जागूनच राहिले. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ मोजणी प्रक्रिया गतिमान करण्याची आणि तात्पुरत्या संरक्षक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.  (Tur Kharedi)

शेलूबाजार बाजारपेठेत पावसामुळे नागरिकांचेही जनजीवन विस्कळीत झाले. ग्रामपंचायत कॉम्प्लेक्समधील नाला ओव्हरफ्लो झाल्याने मालेगाव रोडवरील कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यातील अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.

सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची मोठी धावपळ झाली. (Tur Kharedi)

शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रशासनाकडे आवाहन

शेलूबाजार परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीचे आवाहन केले आहे. नाफेड केंद्रावर संरक्षक यंत्रणा, तात्पुरते छत, माल साठवण्यासाठी बंदिस्त जागा आणि जलनिच्छाजन यंत्रणेची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

रात्रभर जागून तूर सांभाळावी लागली. ताडपत्री टाकली, पण ती पुरेशी नाही. अजून पाऊस आला तर माल भिजेल, अशी भिती होती. - दत्तात्रय पाटील, शेतकरी

पावसामुळे दुकानांत पाणी शिरल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. नाल्यांची साफसफाई प्रशासनाने आधी केली असती, तर हे टळले असते.- रमेश जाधव, व्यापारी

हे ही वाचा सविस्तर :  Hingoli Bajar Samiti : मोंढा बंद, बाजार शांत; पेरणीपूर्वी शेतकऱ्यांची कोंडी वाचा सविस्तर

Web Title: Tur Kharedi: No roof, no counting… Farmers' plight at Nafed center! Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.