Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Tur Kharedi : तूर खरेदीसाठी नवीन केंद्रांना मंजुरी; कशी असेल नोंदणी व खरेदी प्रक्रिया? वाचा सविस्तर

Tur Kharedi : तूर खरेदीसाठी नवीन केंद्रांना मंजुरी; कशी असेल नोंदणी व खरेदी प्रक्रिया? वाचा सविस्तर

Tur Kharedi : Approval for new centers for tur purchase; What will be the registration and purchase process? Read in detail | Tur Kharedi : तूर खरेदीसाठी नवीन केंद्रांना मंजुरी; कशी असेल नोंदणी व खरेदी प्रक्रिया? वाचा सविस्तर

Tur Kharedi : तूर खरेदीसाठी नवीन केंद्रांना मंजुरी; कशी असेल नोंदणी व खरेदी प्रक्रिया? वाचा सविस्तर

Tur Kharedi MSP आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी दिली आहे.

Tur Kharedi MSP आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी दिली आहे.

अहिल्यानगर : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी दिली आहे.

९ केंद्रांवरून हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी, तसेच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली आहे.

हंगाम २०२४-२५ साठी तूर या पिकाची ७ हजार ५५० प्रति क्विंटल दराने १३ फेब्रुवारी २०२५ पासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ९ केंद्रांवरून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

शेवगाव तालुक्यामध्ये सुखायू फार्मर प्रोड्युसर कंपनी, बोधेगाव, पाथर्डी तालुक्यात जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था मार्केट यार्ड, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात शिवदत्त फार्मर प्रोड्युसर कंपनी घारगाव, रिअल अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी घुटेवाडी, जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी मांडवगण येथे नोंदणी करण्यात येईल.

तसेच राहुरी तालुक्यात राहुरी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, राहुरी, पारनेर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड, पारनेर, कोपरगाव तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड, कोपरगाव, तर जामखेड तालुक्यात चैतन्य कानिफनाथ फळ प्र. सहकारी संस्था, खर्डा उपबाजार समिती येथे नोंदणी करण्यात येईल.

खरेदी प्रक्रिया कशी होणार?
सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधार कार्डची, राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते असलेल्या पासबूकची छायांकित प्रत, चालू वर्षाचा ८-अ व ७/१२ उतारा आणि तूर पिकाची नोंद असलेला ऑनलाइन पीकपेरा व मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाचा म्हणजेच काहीही कचरा नसलेला चाळणी करून सुकवून माल केंद्रावर आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नाफेड/एनसीसीएफच्या स्पेसिफिकेशननुसार शेतमालाची तपासणी करण्यात येईल.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार एसएमएस देऊन खरेदीसाठी बोलावण्यात येईल. देण्यात आलेल्या तारखेसच शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर घेऊन येणे बंधनकारक राहील, असेही कळविण्यात आले आहे.

अधिक वाचा: सोलापूर बाजार समितीत बेदाणा सौद्याला सुरवात; पहिल्या लिलावाला कसा मिळाला दर? वाचा सविस्तर

Web Title: Tur Kharedi : Approval for new centers for tur purchase; What will be the registration and purchase process? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.