Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : तूर बाजारात दराची घसरण सुरूच; शेतकरी संतप्त

Tur Bajar Bhav : तूर बाजारात दराची घसरण सुरूच; शेतकरी संतप्त

Tur Bajar Bhav: Tur market prices continue to fall; Farmers angry | Tur Bajar Bhav : तूर बाजारात दराची घसरण सुरूच; शेतकरी संतप्त

Tur Bajar Bhav : तूर बाजारात दराची घसरण सुरूच; शेतकरी संतप्त

Tur Market Rate : मागील वर्षात तुरीचे ९ ते १० हजार रुपये क्विंटल असे स्थिर होते. पण, यंदा शेतकऱ्यांची नवी तूर बाजारात येताच दरात घसरण सुरू झाली आहे.

Tur Market Rate : मागील वर्षात तुरीचे ९ ते १० हजार रुपये क्विंटल असे स्थिर होते. पण, यंदा शेतकऱ्यांची नवी तूर बाजारात येताच दरात घसरण सुरू झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नैसर्गिक संकटाचा सामना करीत राबणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामानेही दगा दिला. पिके चांगल्या अवस्थेत असताना सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तूर, कापूस, सोयाबीन या मुख्य पिकांना फटका बसला. त्याचा परिणाम तुरीच्या उत्पादनात घट झाली असली, तरीही चार महिन्यांत तूरीचे भाव तब्बल साडेतीन ते चार हजारांनी कोसळले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून तुरीला चांगला दर मिळत असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली. पण, बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीन ते साडेतीन हजार रुपये कमी दर मिळत आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत नवा मोंढा यार्डात या हंगामात आजपर्यंत साडेतीनशे कट्टे तुरीची आवक झालेली आहे.

अनेक वर्षांपासून तुरीला बाजारभाव मिळत नसल्याने तुरीचे क्षेत्र दरवर्षी कमी होत आहे. पण, वर्षापूर्वीच तुरीला तब्बल ११ हजार रुपयांचा दर मिळाला होता. गतवर्षी देखील तुरीने ११ हजार रुपयांचा टप्पा गाठला. चांगला दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात तुरीकडे वळले.

यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ७० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड केली होती. सोयाबीन व कापशीत आंतरपीक म्हणून तुरीची पेरणी करण्यात येते. मागील वर्षात तुरीचे ९ ते १० हजार रुपये क्विंटल असे स्थिर होते. पण, यंदा शेतकऱ्यांची नवी तूर बाजारात येताच दरात घसरण सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांनी दर घसरल्याने विक्री पुढे ढकलली

नांदेड येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये महिनाभरापासून नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. पण, तुरीला दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तूर्तास तूर विक्री न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. आर्थिक निकड असलेले गरजवंत शेतकरी सोडले, तर अन्य शेतकऱ्यांनी तूर बाजारात आणूनही विक्रीसाठी तूर्तास थांबवली आहे.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/01/2025
लासलगाव - निफाड---क्विंटल2700071017000
चंद्रपूर---क्विंटल6600063906100
भोकर---क्विंटल20676571006932
कारंजा---क्विंटल3000755075907550
हिंगोलीगज्जरक्विंटल300710075107305
मुरुमगज्जरक्विंटल1217680075207239
सोलापूरलालक्विंटल103678075007050
बारामतीलालक्विंटल138550069016600
लातूरलालक्विंटल7776700074007300
अकोलालालक्विंटल2138755083557800
जळगावलालक्विंटल26610071006700
मालेगावलालक्विंटल110430066516300
चोपडालालक्विंटल300605073506650
आर्वीलालक्विंटल100600071006750
हिंगणघाटलालक्विंटल1569650080958075
वाशीम - अनसींगलालक्विंटल300655075007200
अमळनेरलालक्विंटल70615174007400
चाळीसगावलालक्विंटल1900540169706500
पाचोरालालक्विंटल1500570070166511
सावनेरलालक्विंटल210600171506900
रावेरलालक्विंटल1625562556255
परतूरलालक्विंटल129690071107000
चांदूर बझारलालक्विंटल784650075007250
लोणारलालक्विंटल1266650073216910
मेहकरलालक्विंटल460600075006900
मुळशीलालक्विंटल2690075527551
नांदगावलालक्विंटल63360072006750
दौंड-पाटसलालक्विंटल1635063506350
मंगळवेढालालक्विंटल60600068006500
औराद शहाजानीलालक्विंटल448710073507225
तुळजापूरलालक्विंटल155680071007000
सेनगावलालक्विंटल96670072007000
ताडकळसलालक्विंटल33650070006800
चांदूर-रल्वे.लालक्विंटल94650074007000
आष्टी-जालनालालक्विंटल25675069806950
आष्टी- कारंजालालक्विंटल53650070006720
सिंदीलालक्विंटल54660073307000
सिंदी(सेलू)लालक्विंटल214710074107350
अहमहपूरलोकलक्विंटल846550072557071
घाटंजीलोकलक्विंटल190620074007000
काटोललोकलक्विंटल105600070756750
बारामतीपांढराक्विंटल89620069806951
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल519600074226711
माजलगावपांढराक्विंटल671580072507000
बीडपांढराक्विंटल271659972116951
पाचोरापांढराक्विंटल100609165916311
जामखेडपांढराक्विंटल105680071006950
शेवगावपांढराक्विंटल140680070007000
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल48670070006700
गेवराईपांढराक्विंटल647660072477050
परतूरपांढराक्विंटल98685070667000
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल109680072007000
गंगापूरपांढराक्विंटल240595069006775
औराद शहाजानीपांढराक्विंटल545710074367268
तुळजापूरपांढराक्विंटल115680071007000
आष्टी-जालनापांढराक्विंटल35661170506950
देवळापांढराक्विंटल1707071807180

Web Title: Tur Bajar Bhav: Tur market prices continue to fall; Farmers angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.