Join us

Totapuri Mango : 'पावशी' गेला आता 'तोतापुरी' आला; कसा किलो दिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:27 IST

पूर्वी उन्हाळ्यात रत्नागिरीसह कोकणातून हापूस आणि पावसाळ्यात 'पावशी' आंबा येत होता. किलो-दीड किलो वजनाचा पावशी आंबा असायचा. काळाच्या ओघात तो कमी झाला आहे.

कोल्हापूर : तोतापुरी आंब्याची आवक बाजारात वाढली असून पिवळाधमक आंबा ग्राहकांना भुरळ पाडत आहे.

पूर्वी पावसाळ्यात 'पावशी' आंबा यायचा, मात्र कालांतराने त्याचे उत्पादन कमी होऊन तोतापुरी बाजारात आला. सध्या तोतापुरीची आवक चांगली असून घाऊक बाजारात ४० रुपये किलो दर आहे.

साधारणता फेब्रुवारीपासून हापूस आंब्याची आवक सुरु होते. मे पर्यंत मुबलक प्रमाणात आंबा चाखायला मिळतो. यंदा उन्हाळ्यात दर आवाक्यात असल्याने सामान्य ग्राहकांनीही हापूसची चव चाखली.

पूर्वी उन्हाळ्यात रत्नागिरीसह कोकणातून हापूस आणि पावसाळ्यात 'पावशी' आंबा येत होता. किलो-दीड किलो वजनाचा पावशी आंबा असायचा. काळाच्या ओघात तो कमी झाला आहे.

जून पासून तोतापुरी आंबा बाजारात येतो. कर्नाटकातील विविध जिल्ह्यातून कोल्हापुरात आंबा येतो. यंदा तोतापुरीची आवक चांगली असल्याने दरही ग्राहकांच्या आवाक्यात आहे.

आवक चांगली असून दरही आवाक्यात आहेत. अजून तीन आठवडे आवक स्थिर राहून हळूहळू कमी होत जाईल. - सलीम बागवान, फळे व्यापारी

अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, पीक कर्ज मर्यादेमध्ये मोठे बदल; आता मिळणार वाढीव कर्ज?

टॅग्स :आंबाकोल्हापूरबाजारमार्केट यार्डकोकणहापूस आंबापाऊस