नारायणगाव : कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या टोमॅटो लिलावामुळे जुन्नर तालुक्यातील बेलसर येथील शेतकरी मालामाल झाला आहे. टोमॅटोच्या २० किलो क्रेटला ५०० ते ९०० रुपये बाजार भाव होता.
मात्र, कृषिमंत्र्याच्या लिलावामुळे १४०० रुपये क्रेटला बाजारभाव मिळून ६०० ते ७०० रुपये प्रतिक्रेटला जादा बाजारभाव मिळाल्याने या शेतकऱ्याच्या ७५ क्रेटला ४५००० हजार रुपये बाजारभावापेक्षा अधिक मिळाले.
यावेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम यांनी त्यांचा सत्कार केला. कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, प्रकाश पाटे, गुलाबराव नेहरकर, प्रकाश ताजणे, माउली खंडागळे, सारंग घोलप आदी उपस्थित होते.
भरणे म्हणाले, निसर्गाने साथ आणि योग्य बाजारभाव मिळाल्यास शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे. जुन्नर आणि इंदापूर तालुके द्राक्ष, डाळिंब यांसारख्या पिकांच्या उत्पादनात नावीन्यपूर्ण प्रयोगांमुळे आघाडीवर आहेत.
अधिक वाचा: ३५ गुंठ्यांत 'या' शेतकऱ्याने घेतली तब्बल २६ प्रकारची पिकं; सहा महिन्यात पावणेचार लाखांचे उत्पन्न