Tomato Market मोडनिंब येथील बाजारात सध्या टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. दररोज ६ हजार क्रेटची आवक होत आहे.
सध्या टोमॅटोला प्रति किलो ४० ते ५५ रुपये मिळत आहे. दर टिकून राहिल्यास शेतकरी निश्चितच मालामाल होणार आहेत.
मोडनिंब आडत बाजारासह परिसरात खरेदीदारांकडे मोहोळ तालुक्यातील आष्टी, शेटफळ सिद्धेवाडी, तेलंगवाडी, देवडी, हिवरे, वडाचीवाडी यासह पंढरपूर तालुक्यातील रोपळे, बाबळगाव, आढीव, सुस्ते, तुंगत, येवती, तसेच माळशिरस, माढा तालुका या भागातील माल विक्रीसाठी येत आहे.
सध्या टोमॅटोची काढणी सुरु झाली आहे. मोडनिंबमधून दररोज मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. २५ ते ३० ट्रक टोमॅटो दिल्ली, गुजरात, राजस्थान यासह उत्तर भारतामध्ये पाठविला जातो.
टोमॅटो खरेदीसाठी इतर राज्यातील व्यापारी आले आहेत. टोमॅटो सिझन संपेपर्यंत मोडनिंब येथेच व्यापारी मुक्कामाला असतात.
माझा आठ एकर टोमॅटो आहे. एक दिवसाआड दीडशे ते दोनशे क्रेट माल निघत आहे. सरासरी साडेआठ हजार क्रेट माल आठ एकरातून निघेल, असा अंदाज आहे. दर टिकून राहिल्यास ७० ते ८० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. - पप्पू सुर्वे, शेतकरी, मोडनिंब
अधिक वाचा: आता प्रत्येक शेताला मिळणार १२ फुटांचा शेतरस्ता; पाणंद रस्त्यांसाठी येणार 'ही' योजना