Join us

यंदाच्या उन्हाळी हंगामातील तीळ बाजारात दाखल; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 17:31 IST

Sesame Market Rate : यंदाच्या उन्हाळी हंगामातील तिळाची काढणी अंतिम टप्प्यात असून, शेतकरी शेतमाल बाजारात विक्रीस आणत आहेत. सद्यःस्थितीत तिळाला प्रतिक्विंटल साडेनऊ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यंदाच्या उन्हाळी हंगामातील तिळाची काढणी अंतिम टप्प्यात असून, शेतकरी शेतमाल बाजारात विक्रीस आणत आहेत. सद्यःस्थितीत तिळाला प्रतिक्विंटल साडेनऊ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

विदर्भाच्यावाशिम जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सरासरी क्षेत्राच्या जवळपास दुप्पट क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. यामध्ये एकूण ७१२.३० हेक्टर क्षेत्रावर तिळाची लागवड करण्यात आली. सध्या शेतकऱ्यांनी काढणी पूर्ण करून माल विक्रीस सुरुवात केली आहे. कारंजा बाजार समितीत शनिवारी तिळाला कमाल ९,४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

यावेळी ८० क्विंटल तिळाची आवक झाली होती. तुलनेत मागील काही हंगामांपेक्षा यंदाचा दर समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळी तिळाला सध्या मिळणारा दर पाहता तीळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असून, आगामी हंगामात या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तीळ आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/05/2025
जालनालोकलक्विंटल4105001050010500
अकोलालोकलक्विंटल4850085008500
अमरावतीपांढराक्विंटल3850091008800
मालेगावपांढराक्विंटल1104001040010400
धामणगाव -रेल्वेपांढराक्विंटल15790090008500
भोकरपांढराक्विंटल2914191999170
अहमहपूरपांढराक्विंटल3100001000010000
परांडापांढराक्विंटल1105001050010500

हेही वाचा : बेलोराच्या विशाल ठाकरेंना चवळीचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन; योग्य व्यवस्थापणातून मिळाला लाखोंचा नफा

टॅग्स :बाजारविदर्भवाशिमशेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती