कुळधरण : यंदा लिंबाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे फळबाग उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षापासून शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी तोट्यात आहेत. कोणतेही पीक घेतले, तरी भावाची परवड होते.
फळबागांचीही स्थिती वेगळी नाही. केळी, कलिंगडाचे भाव कोसळले. मात्र, लिंबाने उन्हाळ्यात उच्चांक गाठला. गेल्या वर्षी लिंबाला शंभर रुपये किलोपर्यंत भाव मिळाला होता
यंदा त्यापेक्षा चांगला भाव मिळत आहे. सध्या उच्च प्रतीच्या लिंबाला दीडशे रुपये किलो भाव आहे. सरासरी १२० ते १५० रुपये ठोक भाव आहे.
किरकोळ बाजारात ४० रुपयांत २५० ग्रॅम विक्री सुरू आहे. गेल्यावर्षीपासून सतत हवामानात बदल होत आहे. यंदाही तीच स्थिती आहे.
ढगाळ हवामान, वाढत्या उष्णतेमुळे यंदा मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली. त्यात बागांना फळांचे प्रमाण खूपच कमी आहे. बाजारात आवक कमी असल्याने बाजारात तेजी आल्याचे विजय बोळगे यांनी सांगितले.
लिंबाला गेल्या वर्षीपासून उन्हाळ्यात चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी असले, तरी लिंबू उत्पादकांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. - दत्तात्रय खराडे, लिंबू उत्पादक, भोसे
अधिक वाचा: आता कोणतेही शुल्क न भरता 'या' योजनेतून महिलांचे नाव सातबाऱ्यावार येणार; वाचा काय आहे योजना?
Web Summary : Lemon farmers are relieved as prices hit record highs due to reduced yields from adverse weather. Wholesale prices range from ₹120-₹150 per kg, while retail prices are ₹40 for 250 grams, significantly higher than last year.
Web Summary : खराब मौसम से कम उपज के कारण नींबू की कीमतों में रिकॉर्ड वृद्धि हुई है जिससे किसानों को राहत मिली है। थोक मूल्य ₹120-₹150 प्रति किलो और खुदरा मूल्य ₹40 प्रति 250 ग्राम है, जो पिछले वर्ष की तुलना में काफी अधिक है।