Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासाठी भारी ठरणाऱ्या ज्वारीचे दर आता गव्हापेक्षा वर; वाचा क्विंटलला काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:41 IST

jwari bajar bhav राज्यात गतवर्षी ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याने सध्या बाजारात ज्वारीची आवक लक्षणीय घटली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे ज्वारीचे भाव चांगलेच कडाडले आहेत.

सोलापूर : राज्यात गतवर्षी ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याने सध्या बाजारातज्वारीची आवक लक्षणीय घटली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे ज्वारीचे भाव चांगलेच कडाडले आहेत.

विशेष म्हणजे, वाढत्या आरोग्यविषयक जागरूकतेमुळे आणि पोषक तत्त्वांमुळे लोकांचा ज्वारीची भाकरी खाण्याकडे कल झपाट्याने वाढत आहे.

परिणामी, दरांच्या बाबतीत आता सर्वसामान्यांची ज्वारी चक्क गव्हालाही मागे टाकून पुढे गेली आहे. सध्या किरकोळ बाजारात ज्वारी ४० ते ६० रुपये किलो दराने विकली जात आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत १० एप्रिल रोजी ज्वारीची केवळ ३० क्विंटल आवक झाली. या ज्वारीला किमान ३,९७० रुपये तर जास्तीत जास्त ४,४५० रुपये आणि सरासरी ४,२०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

दुसरीकडे, बाजारात नवीन गव्हाची आवक चांगली सुरू आहे. गव्हाची तब्बल ८१५ क्विंटल आवक झाली असून त्याला कमाल ३,७८५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

किरकोळ बाजारातील दर (किलोमध्ये)◼️ ज्वारी : ४०-६०◼️ गहू : ३०-४५◼️ बाजरी : ३०-३५

आरोग्याच्या फायद्यांची मागणी वाढलीवाढत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि पचनासाठी हलक्या आहाराची गरज असते, त्यासाठी गव्हाच्या पोळीपेक्षा ज्वारीची भाकरी सर्वोत्तम मानली जाते.

फिटनेससाठी वाढता कल◼️ आधुनिक जीवनशैलीत वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आणि फिटनेस जपण्यासाठी तरुण वर्गातही आता 'डायट'चा भाग म्हणून भाकरीला पसंती दिली जात आहे.◼️ ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. तसेच ती 'ग्लूटेन-फ्री' असल्याने मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार असणाऱ्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते असे तज्ज्ञाचे मत आहे.

गेल्या वर्षी पावसाअभावी ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे. याउलट, आरोग्यासाठी ज्वारी खाणाऱ्या ग्राहकांची संख्या आणि मागणी वाढतच आहे. आवक आणि मागणीतील याच तफावतीमुळे यंदा ज्वारीचे दर गव्हापेक्षाही अधिक वाढले आहेत. - सचिन तंबाके, व्यापारी

अधिक वाचा: रेशनकार्डवरील रॉकेल वाटपाचा दर ठरला; प्रतिलिटर किती रुपयाने मिळणार रॉकेल?

English
हिंदी सारांश
Web Title : Jowar prices surpass wheat due to health benefits, lower production.

Web Summary : Jowar prices are soaring due to reduced production and increased demand driven by health awareness. It now exceeds wheat prices, reaching ₹40-60/kg retail. Solapur market saw jowar at ₹4,200/quintal, surpassing wheat's ₹3,785. Fitness trends favor jowar for its fiber and gluten-free properties.
टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरगहूशेतकरीआरोग्यमधुमेहहृदयरोग