Join us

चालू आठवड्यात सोलापूर बाजार समितीत उडीद व मुगाची आवक घटली; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:16 IST

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खरीप हंगामातील शेतमाल बाजारपेठेत कमी प्रमाणात विक्रीसाठी आला आहे. सततच्या पावसामुळे उडीद आणि मुगाच्या सरासरी उताऱ्यात घट झाली असून त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.

सोलापूर : चालू आठवड्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद आणि मुगाची आवक कमालीची घटली असून त्यांचे दरही कमी झाले आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खरीप हंगामातील शेतमाल बाजारपेठेत कमी प्रमाणात विक्रीसाठी आला आहे. सततच्या पावसामुळे उडीद आणि मुगाच्या सरासरी उताऱ्यात घट झाली असून त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.

मंगळवारी उडीद आवक ३९६४ पाकिटे असून २११४ पाकिटांची विक्री झाली तर १८५० पाकिटे शिल्लक राहिली. दरही उतरला असून किमान ४१३५ रुपये तर किमान ५८८० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. यंदाच्या हंगामात महिन्यापूर्वी ७५०० रुपये दर होता.

पिवळ्या मुगाचे अत्यंत कमी उत्पादन झाले असून अवधी ४ पाकिटे आवक होती. ६५०५ रु. प्रतिक्विंटल दराने त्याची विक्री झाली. हिरव्या (चमकी) मुगाची आवक मात्र १२५ पाकिटे होती.

६३ पाकिटांची विक्री झाली तर ६२ पाकिटे शिल्लक राहिली. या मुगाची किमान ४२०० रुपये तर किमान ७४१० रुपये आणि सर्वसाधारण ६५०५ रुपये प्रति किलो दराने विक्री झाली.

पावसाचा परिणामखरीप हंगामाच्या उत्पादनावर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. सततच्या पावसाने उडीद, मूग भिजल्याने त्याला बुरशी आलेली आहे. असा निकृष्ट दर्जाचा माल सध्या बाजारात येत असल्याने खरेदीदारही पुढे येत नाहीत.

यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने उडीद, मुगाची आवक चांगली होईल असे वाटले होते. मागील वर्षी उडदाचा भाव ७ हजार ५०० रुपयांपर्यंत गेल्याने पेरणी अधिक झाली. पण, पावसाने दगा दिला. एकरी १५ ते २० पोती ऐवजी ३ ते ४ पोतीच उत्पादन झाल्याने आवक घटली आहे. - शंकर गाडी, अडत भुसार व्यापारी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

अधिक वाचा: राज्यात बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती येणार; आता मजबूत रस्ते तयार होणार

टॅग्स :मूगसोलापूरशेतकरीपीकपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डपाऊस