Lokmat Agro >बाजारहाट > पेरणीच्या तोंडावर बाजारात तुरीची आवक वाढली; दरात मात्र घसरण सुरूच

पेरणीच्या तोंडावर बाजारात तुरीची आवक वाढली; दरात मात्र घसरण सुरूच

The arrival of turi in the market has increased ahead of sowing; however, the price continues to fall. | पेरणीच्या तोंडावर बाजारात तुरीची आवक वाढली; दरात मात्र घसरण सुरूच

पेरणीच्या तोंडावर बाजारात तुरीची आवक वाढली; दरात मात्र घसरण सुरूच

Tur Bajar Bhav : खरीप पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी गत हंगामात साठवलेली तूर विकत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Tur Bajar Bhav : खरीप पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी गत हंगामात साठवलेली तूर विकत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

खरीप पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी गत हंगामात साठवलेली तूर विकत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध बाजार समित्यांसह वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र मागील आठवड्याभरात तुरीच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यात सरासरी ५८ हजार ६१० हेक्टरवर तुरीची पेरणी अपेक्षित असताना गत हंगामात जिल्ह्यात ६६ हजार ४३६ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे शासनाने तुरीला ७ हजार ५५० रुपये प्रती क्विंटलपर्यतचा हमीभाव जाहीर केला असताना बाजारात त्यापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली जात होती.

त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने विक्री थांबविली. आता दुसऱ्या हंगामाची तयारी सुरू झाली असतानाही तुरीच्या दरात वाढ होण्याऐवजी घसरणच होत असल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे. सद्यस्थितीत सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीचा दर थेट ६,६०० रुपयांपर्यंत घसरला आहे.

दरवाढीची शक्यता कमी !

बाजारतज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी देशांतर्गत तुरीचे उत्पादन समाधानकारक झाले होते. परिणामी सध्या बाजारात तुरीची मुबलक उपलब्धता आहे. त्यामुळे सध्या तुरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.

राज्यातील मंगळवार (दि.०३) रोजीची तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल46600067006350
बार्शी---क्विंटल87570068006600
बार्शी -वैराग---क्विंटल16400057505500
पैठण---क्विंटल8630165156465
भोकर---क्विंटल19556060055782
मुरुमगज्जरक्विंटल132624663716313
लातूरलालक्विंटल3343620067006500
अकोलालालक्विंटल801600068406500
अमरावतीलालक्विंटल4056640066356517
धुळेलालक्विंटल18400060205750
यवतमाळलालक्विंटल478625066806465
चिखलीलालक्विंटल80542563215850
नागपूरलालक्विंटल1164620067046578
चाळीसगावलालक्विंटल80550060005870
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल67600064006200
जिंतूरलालक्विंटल11600061006000
मुर्तीजापूरलालक्विंटल650635067056530
मलकापूरलालक्विंटल1320600068056560
दिग्रसलालक्विंटल26616065956320
सावनेरलालक्विंटल675584964456300
गंगाखेडलालक्विंटल3680069006800
मेहकरलालक्विंटल120580064906300
नांदगावलालक्विंटल33310062205350
औराद शहाजानीलालक्विंटल95600065106255
उमरगालालक्विंटल1630163016301
भंडारालालक्विंटल1620062006200
सिंदीलालक्विंटल53580062506000
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल3600062456100
दुधणीलालक्विंटल907550067006186
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल8440163506165
काटोललोकलक्विंटल83622063016290
माजलगावपांढराक्विंटल115605066006400
जामखेडपांढराक्विंटल10640066006500
शेवगावपांढराक्विंटल70640064006400
देउळगाव राजापांढराक्विंटल5580059005900
गंगापूरपांढराक्विंटल18580062006000
औराद शहाजानीपांढराक्विंटल128616166256393

सौजन्य : कृषी पणन महामंडळ महाराष्ट्र राज्य. 

हेही वाचा : शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा 

Web Title: The arrival of turi in the market has increased ahead of sowing; however, the price continues to fall.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.