Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > आखातातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत; खाद्यतेल तब्बल १० ते १२ टक्क्यांनी महागले

आखातातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत; खाद्यतेल तब्बल १० ते १२ टक्क्यांनी महागले

Supply chain disrupted due to Gulf war; Edible oil prices rise by 10 to 12 percent | आखातातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत; खाद्यतेल तब्बल १० ते १२ टक्क्यांनी महागले

आखातातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत; खाद्यतेल तब्बल १० ते १२ टक्क्यांनी महागले

आखातातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होत आहे. सोयाबीन, सूर्यफूल, मका आणि पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने किमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

आखातातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होत आहे. सोयाबीन, सूर्यफूल, मका आणि पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने किमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

मोरेश्वर मानापुरे

आखातातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होत आहे. नागपूरच्या बाजारपेठेत सोयाबीन, सूर्यफूल, मका आणि पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने किमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. हे युद्ध पुढील १५ दिवस असेच सुरू राहिले, तर खाद्यतेलाचे भाव आणखी १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

आवक घटली, महागाई वाढली

• नागपुरात सर्वाधिक विक्रीचे सोयाबीन तेल १५ दिवसांत प्रतिकिलो २० रुपयांनी महागले.

• भारतात सूर्यफूल आणि पाम तेलाची मोठी आयात रशिया, युक्रेन, मलेशिया आणि इंडोनिशिया यांसारख्या देशांतून होते.

• मात्र, युद्धामुळे जहाजांची ये-जा थांबली असून, आयातीवर मर्यादा आल्या आहेत.

• आयातीतील अडथळ्यांमुळे सोयाबीन व सूर्यफूल या तेलांच्या डब्यामागे १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे.

• तसेच हॉटेल आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या मका व पाम या तेलांची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे.

दरवाढ की 'कृत्रिम' टंचाई?

चढ-उतार ही दरवाढ नैसर्गिक आहे की, व्यापाऱ्यांकडून निर्माण केलेली कृत्रिम टंचाई? अशी बाजारात सध्या चर्चा आहे जाणकारांच्या मते, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने ही दरवाढ झाली आहे. परंतु, काही ठिकाणी साठेबाजीमुळेही किमतीत पाहायला मिळत आहेत.

गृहिणींचे बजेट कोलमडले

आधीच डाळी आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त असलेल्या गृहिणींच्या अडचणीत आता तेलाच्या दरवाढीने भर टाकली आहे. आधीच महागाई शिगेला पोहोचली आहे, त्यात आता फोडणीसाठी लागणारे तेलही महागल्याने महिनाभराचे नियोजन कसे करावे, हा मोठा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया एका गृहिणीने दिली.

खाद्यतेलाचे किलो दर (रुपयात)

खाद्यतेल पंधरा दिवसांआधीचे दरसध्याचे दर
सोयाबीन१४६ १६६ 
शेंगदाणा१८० १९० 
सूर्यफूल १७० १९० 
राईस ब्रान१४५ १६० 
मोहरी १६० १८० 
पाम १४५ १६० 
जवस १६५ १८० 
खोबरेल ४४० ४५० 

पुढील १५ दिवस कळीचे

व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय युद्ध स्थिती पुढील दोन आठवड्यात निवळली नाही, तर कच्च्या मालाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प होईल. अशा स्थितीत खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर १५ ते २० रुपयांनी आणखी वाढू शकतात.

हेही वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा नैसर्गिक खजिना; जाणून घ्या आरोग्यदायी 'शिंगाडा'चे लाभदायक फायदे

Web Title : खाड़ी युद्ध से आपूर्ति श्रृंखला बाधित; खाद्य तेल के दाम तेजी से बढ़े।

Web Summary : खाड़ी युद्ध के कारण वैश्विक आपूर्ति श्रृंखला बाधित हो गई है, जिससे आवश्यक वस्तुओं की कीमतों पर असर पड़ा है। सोयाबीन, सूरजमुखी और पाम तेल के आयात में कमी के कारण नागपुर बाजार में खाद्य तेल की कीमतों में 10-12% की वृद्धि हुई। संघर्ष जारी रहने पर कीमतों में और वृद्धि की आशंका है।

Web Title : Gulf War disrupts supply chain; Edible oil prices rise sharply.

Web Summary : The Gulf War disrupted the global supply chain, impacting essential commodity prices. Nagpur market saw a 10-12% increase in edible oil prices due to reduced imports of soybean, sunflower, and palm oil. Further price hikes are feared if the conflict continues.