Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात तेजी; वाचा कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:36 IST

solapur kanda bajar bhav मागील काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. पुणे, इंदापूर, अहिल्यानगर, विजयपूर, धाराशिव, उमरगा व सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून कांदा विक्रीसाठी येत आहे.

सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याला कमाल दर २७५० असा उच्चांकी भाव मिळाला.

मंगळवारी बाजार समितीत १७६ कांद्याचे ट्रक लिलावासाठी आले होते. किमान दर १००, कमाल २७५०, तर सर्वसाधारण दर १२५० असा भाव मिळाला.

मंगळवारी २ कोटी २१ लाख २ हजार ५०० रुपयांची उलाढाल कांदा मार्केटमध्ये झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. मंगळवारी ३५ हजार ३६४ क्विंटल पिशव्यात १७ हजार ६८२ क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता.

मागील काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. पुणे, इंदापूर, अहिल्यानगर, विजयपूर, धाराशिव, उमरगा व सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून कांदा विक्रीसाठी येत आहे.

कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ उतारामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र सध्या तरी चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.

अधिक वाचा: शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर 'या' शेतकऱ्यांना विकता येणार आता मर्यादेपेक्षा अधिक सोयाबीन

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Market Sees Surge in Onion Prices, Farmers Rejoice

Web Summary : Solapur market witnessed a high onion price of ₹2750. 176 trucks arrived for auction, with prices ranging from ₹100 to ₹2750. The market turnover reached ₹2.21 crore. Increased onion arrival from various districts brings relief to farmers despite price fluctuations.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरशेतकरी