Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आतापर्यंत दीड लाख गाठी कापसाची खरेदी, प्रतिक्विंटल मिळतोय 'एवढा' भाव

राज्यात आतापर्यंत दीड लाख गाठी कापसाची खरेदी, प्रतिक्विंटल मिळतोय 'एवढा' भाव

So far, one and a half lakh bales of cotton have been purchased in the state, and the price per quintal is ``this'' | राज्यात आतापर्यंत दीड लाख गाठी कापसाची खरेदी, प्रतिक्विंटल मिळतोय 'एवढा' भाव

राज्यात आतापर्यंत दीड लाख गाठी कापसाची खरेदी, प्रतिक्विंटल मिळतोय 'एवढा' भाव

खासगी बाजारात विक्री : शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत

खासगी बाजारात विक्री : शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत

शेअर :

Join us
Join usNext

राजरत्न शिरसाट

राज्यात आतापर्यंत खासगी बाजारात दीड लाख गाठी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. परंतु दर प्रतिक्विंटल ६,८०० रुपयांपर्यंत असल्याने शेतकरी दरवाढीचे प्रतीक्षेत आहेत..

यावर्षी राज्यात ४८ लाख हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे. परंतु पावसाच्या लहरीपणाचा फटका सोयाबीनसह कापूस पिकालाही बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर हवे आहेत. परंतु भारतीय कापूस महामंडळ व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केली नसल्याने सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कापसाची विक्री खासगी बाजारात व्यापाऱ्यांना करावी लागत आहे. म्हणूनच सध्या राज्यातील खासगी बाजारात दररोज १२ हजार गाठींची विक्री केली जात आहे. खासगी बाजारात सध्या प्रतिक्विंटल ६,८०० ते ७ हजार रुपये दर आहेत. सीसीआय व पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू केल्यास दर वाढण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.

गतवर्षी सीसीआयसोबत करार न झाल्याने पणनचे कापूस खरेदी केंद्र बंद होते. यावर्षी करार होईल अशी अपेक्षा आहे. राज्यातील या सहकारी संस्थेला वाचवायचे असेल तर शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष, पणन महासंघ

'पणन'ला करावा लागणार 'सीसीआय'सोबत करार

राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून पनमहासंघाकडील खरेदी बंद झाल्यानंतर केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाचा (नाफेड) उपअभिकर्ता म्हणून पणन महासंघाने चार ते पाच वर्षे राज्यात सीसीआय सोबत करार करावा लागणार आहे.

Web Title: So far, one and a half lakh bales of cotton have been purchased in the state, and the price per quintal is ``this''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.