Join us

Sitafal Market : सीताफळांचा नवा हंगाम सुरू कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 10:36 IST

सीताफळांचा हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच बाजारात उशिराने का होईना, सीताफळांची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात आता चांगली मोठी सीताफळे दिसू लागली आहेत.

सोलापूर : सीताफळांचा हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच बाजारात उशिराने का होईना, सीताफळांची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात आता चांगली मोठी सीताफळे दिसू लागली आहेत.

शिवाय त्यांचे दरही आवाक्यात असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्यांचा आस्वाद घेता येत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बार्शी, सांगोला, मंगळवेढा, करमाळा सोबतच शेजारील राज्य हैदराबाद येथून आवक होत आहे.

साठ ते शंभर रुपये प्रतिकिलो दराने शहरात उपलब्ध होत आहे. शहरातील बाजारात ठिकठिकाणी सीताफळ विक्रेत्यांनी आपली दुकाने लागल्याचे दिसून येत आहे. शहरातील घाऊक बाजारात विविध प्रकारची फळे उपलब्ध आहेत. 

गावरान आणि गोल्डन दोन प्रकाररसाळ व मधुर फळ असलेल्या सीताफळाला नॅचरल आईसक्रिम म्हणून ओळखले जाते. मागील पंधरवड्यापासून सीताफळांची आवक वाढू लागली आहे. बाजारपेठेत दोन प्रकारच्या सीताफळांची आवक होते. यात गावरान वाणाला प्रतिकिलो ६० ते १०० रुपयांपर्यंत तर मोठ्या आकाराच्या किंवा गोल्डन वाणाला ८० ते १५० रुपये व त्यापुढे दर मिळतो आहे.

किमान दर दोन हजारगुरुवारी ३५७ क्विंटल सीताफळ कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समितीत दाखल झालेत. त्यास किमान भाव २ हजार रुपये तर दर्जानुसार कमाल भाव ६ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तर शुक्रवारी ४८३ क्चिटल झाली तर शनिवारी ४० क्विंटल आवक होती. त्यास किमान भाव २ हजार रुपये तर दर्जानुसार कमाल भाव ११ हजार रुपये मिळाला.

सध्या फळबाजारात सीताफळाची आवक हैदराबाद व बार्शी, सांगोला, मंगळवेढा आदी जिह्यांतील ग्रामीण भागातून होत आहे. दर कमी असल्याने नागरिक खरेदी करत आहेत. - फरीद शेख, फळ विक्रेते

टॅग्स :बाजारशेतकरीशेतीबार्शीसोलापूरफळेमार्केट यार्ड