Join us

Sitafal Bajar Bhav : आरोग्यासाठी उपयुक्त 'या' सीताफळाची बाजारात आवक वाढली; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 09:39 IST

आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या सीताफळाचा हंगाम आता सुरू झाला असून, बिया कमी आणि गर जास्त असणाऱ्या ह्या देशी सीताफळाची बाजार समितीत आवक वाढू लागली आहे.

कोल्हापूर : आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या सीताफळाचा हंगाम आता सुरू झाला असून, बिया कमी आणि गर जास्त असणारे 'बाळानगरी' देशी सीताफळाची बाजार समितीत आवक वाढू लागली आहे.

हे गोड सीताफळ घाऊक बाजारात १८० रुपये किलो असून, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवक हळूहळू वाढू लागली आहे. बाजार समितीत सीताफळाची वर्षभर आवक सुरू असते.

मात्र, थेट शेतकऱ्यांकडून येण्याचे प्रमाण कमी असते. बाजार समितीमध्ये परवेज बागवान यांच्या अडत दुकानात सीताफळाची आवक झाली होती. प्रशांत भोसले यांनी प्रति किलो १८० रुपयांनी खरेदी केली.

मेमध्ये झालेल्या पावसाचा परिणाम सीताफळ उत्पादनावर दिसत आहे. यंदा सगळीकडेच एकसारखा पाऊस राहिल्याने फळे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाई, अथणी येथून होते आवककोल्हापूर बाजार समितीत विविध जिल्ह्यांतून कमी-अधिक प्रमाणात सीताफळाची आवक होते. मात्र, 'बाळानगरी' देशी सीताफळाची आवक वाई, अथणी येथून सुरू आहे.

एक किलोचे सीताफळ'बाळानगरी' सीताफळ गोडीला चांगले आहेच, त्याचबरोबर आकाराने तुलनेत मोठे आहे. साधारणतः अर्धा ते एक किलो वजनाची सर्रास सीताफळे सध्या बाजारात दिसत आहेत.

सीताफळ आरोग्यासाठी उपयुक्त..सीताफळ आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण त्यात व्हिटॅमिन सी, लोह, फायबर, कॅल्शियम आणि इतर जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, रक्त सुधारते, हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते. हे फळ हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासही मदत करते.

सीताफळाची आवक यंदा कमी असून, दर चांगले आहेत. कोल्हापूर बाजार समितीत तुलनेत अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आवक करावी. - परवेज बागवान, फळ व्यापारी, कोल्हापूर

अधिक वाचा: अखेर 'एफआरपी'चा निर्णय झाला; आता त्याच वर्षाचा साखर उतारा धरून शेतकऱ्यांना पेमेंट होणार

टॅग्स :फळेबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीफलोत्पादनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकोल्हापूरमधुमेहदसरा