यंदा मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. मागील वर्षी प्रतिकिलो १४० ते १६० रुपयांदरम्यान असलेला तीळ यंदा १८० ते २२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
हवामानातील बदल, उत्पादनात झालेली घट, वाहतूक खर्चात वाढ आणि साठेबाजी यामुळे दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुळाच्या किमतीदेखील वाढल्या असून साखर कारखान्यांमधील उत्पादन खर्च याला कारणीभूत ठरत आहे.
दरवाढ असूनही तिळगुळाची मागणी मात्र कायम आहे. घरगुती पातळीवरच नव्हे तर हॉटेल, मिठाई दुकाने आणि महिला बचत गटांकडून मोठ्या प्रमाणावर तिळाच्या पदार्थाची निर्मिती सुरू आहे.
अनेक महिला बचत गटांसाठी हा सण रोजगार निर्मितीचे साधन ठरत असून तिळाच्या वड्या, चिकी, लाडू यांची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे.
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला
• मकरसंक्रांती हा महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्याचबरोबर हिवाळ्याच्या ऋतूमध्ये उष्णतेचा स्पर्श वाढू लागतो.
• या बदलत्या ऋतूचे स्वागत करण्यासाठी तिळगुळ, गुळपोळी, तिळाच्या वड्या, लाडू यांसारख्या पदार्थांना विशेष महत्त्व दिले जाते. "तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला" हा संदेश देणारा हा सण सामाजिक सलोख्याचे प्रतीक मानला जातो.
कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तील आवक आणि दर
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
|---|---|---|---|---|---|---|
| 08/01/2026 | ||||||
| मानोरा | --- | क्विंटल | 1 | 9500 | 9500 | 9500 |
| यवतमाळ | गज्जर | क्विंटल | 8 | 8700 | 8900 | 8800 |
| अकोला | लोकल | क्विंटल | 44 | 10000 | 10750 | 10350 |
| मुंबई | लोकल | क्विंटल | 176 | 12500 | 17000 | 14750 |
| मलकापूर | लोकल | क्विंटल | 8 | 7800 | 10800 | 10500 |
| मुरुम | लोकल | क्विंटल | 2 | 8351 | 9000 | 8676 |
| अमरावती | पांढरा | क्विंटल | 6 | 8000 | 9000 | 8500 |
| सिंदी(सेलू) | पांढरा | क्विंटल | 2 | 7000 | 7000 | 7000 |
