कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत नियमानुसार बिगर रंगाच्या गुळाला ४१ रुपये, तर रंग मिसळलेल्या गुळाला ४७ रुपये दर मिळतो. खरेदीदारांनाच चकचकित गूळ हवा असतो.
गुजरातमध्ये सिंथेटीक रंग सापडलेला गूळ हा 'रायबाग' येथून खरेदी केलेला होता, असा दावा बाजार समितीचा आहे. मग, कोल्हापूरचा गूळ बदनाम का करता, असा सवाल येथील शेतकरी करू लागले आहेत.
गुजरातमध्ये एक किलोच्या रव्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये सिंथेटीक रंग असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई केली.
प्रयोगशाळेत तपासणी करूनच गूळ पाठवा, असा फतवा गुजरात येथील गूळ खरेदी असोसिएशनने काढल्याने येथील खरेदीदारांसमोर पेच निर्माण झाला आहे.
रंगविरहित गूळ तयार करा, असा आग्रह खरेदीदारांचा आहे, त्यानुसार दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने रंगविरहित गूळ सौद्याला आणला.
इतर गुळाला ४७ रुपये किलोला भाव मिळाला, पण रंगविरहित गूळ ४१ रुपयांनी मागितला. किलो मागे ६ रुपयांचा तोटा करून गूळ विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने संबंधित शेतकऱ्याने परत नेला.
संबंधित खरेदीदाराला नोटीस◼️ गुजरातमध्ये सिंथेटीक रंग सापडलेल्या गूळ खरेदीदाराला बाजार समितीने नोटीस काढून खुलासा मागितला.◼️ एकाच वेळी अनेक ठिकाणांहून गूळ घेत असल्याने तो गूळ कोठून खरेदी केला, हे सांगता येत नसल्याचे उत्तर संबंधित खरेदीदाराने दिले आहे.
खरेदीदारांच्या जिभेला साखरेसह रंगाची गोडीकोल्हापूरचा शेतकरी साखर वापरून गूळ तयार करत नव्हता. पण कर्नाटकातून साखर व रंग मिश्रित आकर्षक गूळ येऊ लागल्याने खरेदीदारांनीच येथील शेतकऱ्यांना साखर व रंगाची सवय लावल्याचे शेतकरी सांगत आहेत.
गूळ कर्नाटकातील पत्ता कोल्हापूरचाएकाच खरेदीदाराचे अनेक ब्रँड आहेत. गूळ कर्नाटकातून खरेदी करायचा, त्यावर आपल्या ब्रँडखाली पॅकिंग करायचे आणि गुजरातला पाठवायचा मात्र, त्या खरेदीदाराचा पत्ता कोल्हापूर बाजार समितीचा असतो
गुजरातमध्ये सोमवारपासून दोन दिवस गूळ खरेदी बंद असल्याने गुऱ्हाळ घरे बंद केली आहेत. आजपासून (दि. १७) सौदे सुरू होतील. - तानाजी दळवी, सचिव बाजार समिती
रंगविरहित गूळ उत्पादन करण्यास आम्ही तयार आहोत, व्यापारी घेतात का बघा? बाजार समितीने तो गूळ घेतला पाहिजे. सौदे बंद ठेवून आमचे नुकसान होत असल्याने काहीतरी तोडगा काढावा. - शिवाजी पाटील, गूळ उत्पादक
अधिक वाचा: दहा किलोवॅटपेक्षा अधिक सौर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना झटका; लागू होणार आता 'हे' चार्जेस
Web Summary : Jaggery with synthetic color, sourced from Raibag, was sold as Kolhapur's. Kolhapur farmers question the bad name. Gujarat buyers demand color-free jaggery, but it fetches lower prices, hurting farmers. A notice was issued to the buyer, who couldn't identify the exact source.
Web Summary : रायबाग से खरीदे गए सिंथेटिक रंग वाले गुड़ को कोल्हापुर का बताकर बेचा गया। कोल्हापुर के किसानों ने बदनामी पर सवाल उठाए। गुजरात के खरीदार रंग-मुक्त गुड़ की मांग कर रहे हैं, लेकिन इसकी कीमत कम है, जिससे किसानों को नुकसान हो रहा है। खरीदार को नोटिस जारी, स्रोत बताने में असमर्थ।